घरमहाराष्ट्रनाशिक२२ नोव्हेंबरच्या आत होणार नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक

२२ नोव्हेंबरच्या आत होणार नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक

Subscribe

नाशिकमधील महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण खुल्या प्रवर्गाला जाहीर झाल्यानंतर आता महापौरपदाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या सर्वच महापौरपदाच्या निवडणुका येत्या २२ नोव्हेंबरच्या आत होणार असून नाशिकमधील महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण खुल्या प्रवर्गाला जाहीर झाल्यानंतर आता महापौरपदाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही निवडणूक २२ नोव्हेंबरच्या आत घेण्यासाठी महापालिकेतील सत्ताधार्‍यांकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. तसा प्रस्तावही तयार करण्यात आला असून तो १५ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे.

आता लक्ष विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे

महापालिकेत भाजपाला अगदी स्पष्ट बहुमत आहे. यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला कोणतीही अडचण नाही. परंतु, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्याने नाशिक महापालिकेतील भाजपकडील महापौरपदही धोक्यात येऊ शकते. यामुळे या पदासाठी शिवसेना आणि भाजपकडून अटीतटीची लढत झाल्याशिवाय राहणार नाही, हेही निश्चित. भाजपाकडे ६५ नगरसेवक असले तरी शिवसेना दोन्ही काँग्रेस, अपक्ष आणि मनसेला बरोबर घेऊन महापौरावर कब्जा करू शकते. त्यातही भाजपाकडील काही नाराज नगरसेवक माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या माध्यमातून हाती लागले तर शिवसेनेच्या दृष्टीने ही फायदेशीर बाब असेल. यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी आपापले नगरसेवक ‘सेफ झोन’मध्ये ठेवणे आता भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. महापालिकेतील यापूर्वीचे महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी होते. त्यावेळी भाजपाने ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी यांना संधी दिली. तीन महिन्याच्या मुदतवाढीनंतर आता त्यांचा कार्यकाळ कालावधी येत्या १५ डिसेंबरला संपत आहे. मात्र, महापौरपदाच्या निवडणुकीस महिनाभराचा कालावधी दिल्यास विरोधकांना खलबतांसाठी पुरेसा कालावधी मिळू शकतो. विशेषत: भाजपचे नगरसेवक कवेत घेणे विरोधकांना सोयीचे होऊ शकते. या भीतीपोटी निवडणूक येत्या २२ नोव्हेंबरच्या आत घेण्याचे नियोजन सत्ताधार्‍यांचे सुरु झाले आहे. महापौरपदाला मुदतवाढ मिळण्यापूर्वी २२ ऑक्टोबरला निवडणूक घेण्याचे निश्चित झाले होते. त्यादृष्टीने आता २२ नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. तसा प्रस्तावही महापौर रंजना भानसी यांनी नगरसचिवांमार्फत तयार केल्याचे कळते. हा प्रस्ताव शुक्रवारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांना सादर केला जाईल आणि त्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीबाबत अंतीम निर्णय होईल.

- Advertisement -

पक्षीय बलाबल असे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -