घरमहाराष्ट्रनाशिकगुन्हेगाराने घरात घुसून केले बालिकेचे अपहरण

गुन्हेगाराने घरात घुसून केले बालिकेचे अपहरण

Subscribe

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावातील घटना, मुलीच्या कुटुंबियांनाही गुंडाने केली मारहाण

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावात एका गुंडाने घरात घुसून कुटुंबियांना मारहाण करत अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली. याप्रकरणी वणी पोलिसांनी गावातल्या रायबा तानाजी संधान याच्याविरुद्ध अपहरण, मारहाण आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.

२९ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास संधान गावातल्या एका घरात अचानक घुसला आणि अल्पवयीन मुलीला ओढून घेऊन गेला. मुलीच्या कुटुंबियांनी त्याला विरोध करताच त्याने त्यांना मारहाण केली आणि धमकी दिली. संधान विवाहित असून, त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठवण्यात आला होता, मात्र तो रद्द झाल्यानं त्याची गुंडगिरी वाढत गेल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे पोलिसांनी मुलीला शोधून संधानवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -