घरमहाराष्ट्रनाशिकतलाठीची महा'परीक्षा' पडली महागात

तलाठीची महा’परीक्षा’ पडली महागात

Subscribe

मातोश्री कॉलेज येथून महागड्या मोबाईलची चोरी

महापरीक्षेंतर्गत घेतल्या जाणाऱ्या तलाठी पदासाठी रविवारी (ता.२१) मातोश्री पॉलेटेक्निक कॉलेज, एकलहरे येथे परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परिक्षेसाठी भूषण भीमसिंग गौतम (२२, रा.लोहणेर, ता.देवळा) हे परीक्षा देण्यासाठी बाहेर गावाहून आले होते. परीक्षा केंद्रावर उमेदवारांजवळील साहित्त्य ठेवण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने उमेदवाराने वर्गात जाण्यापुर्वी मोबाईल वर्गाबाहेर ठेवला.

परीक्षा देवून बाहेर आले असता मोबाईल लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी भूषण गौतम यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार एस. डी. गायकवाड करीत आहेत. परीक्षा केंद्रावरच्या जाचक अटींमुळे विद्यार्थ्यांना मानसिक फटक्यासोबतच आर्थिक फटकाही बसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -