‘यंदा मोदी लाट नाही’, संजय राऊत उवाच

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत २०१४ प्रमाणे कोणतीही लाट नाही. प्रचारातील मुद्देदेखील वेगळे आहेत. पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या कामांचा कस या निवडणुकीत लागणार आहे. असे असले तरी सत्तेवर भाजप- शिवसेनाच येईल, असा विश्वास शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Nashik
Sanjay-raut
शिवसेना खासदार संजय राऊत

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत २०१४ प्रमाणे कोणतीही लाट नाही. प्रचारातील मुद्देदेखील वेगळे आहेत. पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या कामांचा कस या निवडणुकीत लागणार आहे. असे असले तरी सत्तेवर भाजप- शिवसेनाच येईल, असा विश्वास शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. नाशिक येथे त्यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला.

कोणतीही लाट परत परत कधी येत नाही आणि अशा लाटेवर पुन्हा निवडणूक लढवलीही जात नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी हे प्रभावी नेते आहेत. विरोधक सांगतात आमच्याकडे पाच उमेदवार आहेत, यातच त्यांचा पराभव आहे. कारण एकापेक्षा अधिक उमेदवार असतात, तेव्हा अगदी विरोधी पक्षनेता निवडण्यासाठीही अडचणी येतात. मग पंतप्रधान कसा निवडणार, असा सवाल करत त्यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. विरोधकांकडे पाच उमेदवार असल्याने पदासाठी मारामारी होणार हे निश्चित. असे सरकार कमकुवत असते असे सांगत एनडीएमध्ये सर्व पक्षांनी एकत्र येऊन पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे एकमेव नाव निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासावर न बोलता काश्मीर, सर्जिकल स्ट्राईक, शरद पवार, राहुल गांधी यांच्यावरच त्यांचा रोख असतो यावर राऊत म्हणाले, त्यांनी पाच वर्षात केलेला विकास जनतेला माहीत आहे. त्यामुळे या टिकेत तथ्य नाही.

नरेंद्र मोदी हुकुमशाह, हिटलर असे आरोप विरोधक करतात. आरोप खरे असते तर मोदी यांनी ते ऐकले असते का? देशात लोकशाही आहे. जेव्हा इंदिरा गांधीं हुकुमशाह झाल्याचे जाणवले तेव्हा लोकांनी त्यांना पायउतार केले. पुढे पुन्हा सत्ता दिली. वंचित आघाडी ही भाजपाची ‘बी टीम’ असल्याच्या आरोपाचे त्यांनी खंडन केले. रिपाइंचे सर्व गट निस्तेज झाले असून, त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन रालोआत सामील व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here