घरमहाराष्ट्रनाशिकविवाहीत प्राध्यापिकेला वर्गमित्राने लावले कुंकू

विवाहीत प्राध्यापिकेला वर्गमित्राने लावले कुंकू

Subscribe

एम.एस्स.सीची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या वर्गमित्राने थेट विवाहित प्राध्यापिकेच्या कपाळाला कुंकू लावल्याचा धक्कादायक प्रकार गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयातील मायक्रोबायलॉजीच्या लॅबमध्ये घडला. या प्रकरणी योगेश रमेश जावळे याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे.

शहरातील नामांकित महाविद्यालयात हा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे. घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असून त्याविषयी संतप्त भावना, प्राध्यापक, कर्मचार्‍यांसह विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित प्राध्यापिकेस मखमलाबाद नाका परिसरातील चव्हाणके टॉवर येथील रहिवासी योगेशने जावळेने मोबाइलवर संपर्क साधत लग्नाची मागणी घातली. त्यास प्राध्यापिकेने नकार दिल्याने योगेश सोमवारी २१ जानेवारीस सायंकाळी ५ च्या सुमारास महाविद्यालयातील मायक्रोबायलॉजीच्या लॅबमध्ये आला. तेथेही त्याने ‘मला नोकरी लागली आहे, आता तू माझ्याशी लग्न कर’, अशी मागणी केली. त्यास नकार मिळाल्याचा राग येऊन त्याने थेट विवाहितेचा हात धरला व खिशातून कुंकुवाची पुड काढत कपाळावर कुंकू भरण्याचा प्रयत्न केला.

विवाहितेने त्याचा हाताला जोरदार हिसका दिल्याने कुंकवाची पूडी जमिनीवर पडली. यावेळी झालेल्या आरडाओरडीचा आवाज ऐकून पिडितेला सोडविण्यासाठी महाविद्यालयाच्या कर्मचार्‍यांनी धाव घेतली. यावेळी संशयित योगेशने कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्न केल्याचे पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सरकारवाडा पोलिसांनी संशयित जावळेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी (दि.२२) संध्याकाळी त्यास जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. या घटनेनंतर महाविद्यालयाच्या परिसरात एकच चर्चा सुरू होती. घडलेला प्रकार अत्यंत निंदणीय असा असून संतप्त भावना शिक्षकवर्गातून उमटल्या. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे तपास करीत आहेत.

- Advertisement -

अंगठी देण्याचा प्रयत्न

योगेश जावळे आणि पिडीतेने एकाच वर्गात २०११ मध्ये शिक्षण घेतले होते. त्यानंतर पिडिता गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत झाल्या. योगेशला नोकरी मिळाली नाही. तो दोन महिन्यांपासून पिडीतेला एकतर्फी प्रेमातून त्रास देत होता. गेल्या महिन्यात तो पिडितेकडे चक्क अंगठी देखील घेऊन गेल्याचे पोलिसांनी सांगितले. असे वागणे योग्य नाही, असे सांगत पिडीतेने योगेशला समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु तरीही योगेशने सोमवारी महाविद्यालयात येऊन पिडीतेला कुंकू लावण्याचा प्रयत्न केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -