घरमहाराष्ट्रनाशिकबालिकेचा खून; आई पोलिसांच्या ताब्यात

बालिकेचा खून; आई पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

आईची संशयास्पद भूमिका आढळल्याने पोलिसांनी घेतले ताब्यात

पंचवटीतील बालिकेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी बुधवारी (१७ जुलै) सायंकाळी तिच्या आईला ताब्यात घेतले. बालिकेच्या आईने दिलेल्या जबाबातील विसंगती बघता बालिकेच्या हत्येत तिच्या आईचीच संशयास्पद भूमिका असल्याचे स्पष्ट झाल्याने, पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

औरंगाबाद रोडवरील पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या पवार कुटुंबातील स्वरा मुकेश पवार या १४ महिन्यांच्या बालिकेच्या हत्येची घटना मंगळवारी (१६ जुलै) उघडकीस आली होती. या मुलीच्या गळ्यावर जखमा आढळून आल्या होत्या, तिला रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषीत केले होते. दरम्यान, या घटनेबाबत बालिकेच्या आईने पोलिसांना जी माहिती दिली, त्यात वारंवार तफावत आढळल्याने प्रमुख संशयित म्हणून पोलिसांनी तिच्यावर लक्ष केंद्रीत केले होते. तिच्या खूनात तिच्या आईची भूमिका संशयास्पद असल्याने तिला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -