घरमहाराष्ट्रनाशिकथकीत पाणीपट्टी भरा,नाहीतर पाण्याला व्हाल मोहताज

थकीत पाणीपट्टी भरा,नाहीतर पाण्याला व्हाल मोहताज

Subscribe

नाशिक महापालिकेचा इशारा; वर्षभरात ४६०० थकबाकीदारांचे नळकनेक्शन केले खंडित

अवघ्या दोन महिन्यात आर्थिक वर्ष संपत आल्यामुळे पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी पालिकेने तब्बल ४६०० थकबाकीदारांचे नळकनेक्शन खंडित केले आहेत. यामध्ये नवीन नाशिक विभागातील सर्वाधिक १२४० थकबाकीदारांचा समावेश आहे.
’ना नफा ना तोटा’ तत्त्वावर महापालिकेचा पाणीपुरवठा करणे अपेक्षित असले तरी गेल्या काही वर्षात तोट्याचेच आकडे वाढत चालले आहे. पालीकेने नळजोडणीसंदर्भात रहिवासी एक लाख ८८ हजार ३९७, व्यावसायिक ३,९११, अव्यावसायिक ४,२४८ असे एकूण १ लाख ९६ हजार ५५६ नळ कनेक्शन महापालिकेने दिले आहेत. त्यांच्याकडून एकूण उद्दिष्टापैकी थकबाकीची जेमतेम २५ टक्के तर चालू बिलापोटी ४९ टक्केच पाणीपट्टी वसूल होऊ शकली आहे. अद्यापही २८ हजार ५५७ नळ कनेक्शनधारकांकडे पालिकेची तब्बल ४० कोटी २५ लाखांची पाणीपट्टी थकीत असल्यामुळे त्यांची नळजोडणी खंडीत केली जात आहे. एप्रिल २०१९ पासून आतापर्यंत ४६०० थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत.

५९ कोटींची थकबाकी
आर्थिक वर्ष संपण्यासाठी दोन महिने बाकी असताना तब्बल ५९ कोटी रुपयांची थकीत पाणीपट्टी वसुलीचे आव्हान प्रशासनासमोर आहे. नळजोडणी खंडित करण्याबरोबरच थकबाकी भरण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. घंटागाडीद्वारे जनजागृती केली जात आहे. घरपट्टीच्या अभय योजनेतही प्रथम पाणीपट्टी भरल्यानंतरच घरपट्टीत सवलत दिली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -