घरताज्या घडामोडीनाशकात खून, कार लुटमार करणार्‍या मुंबईच्या सराईत गुन्हेगाराला अटक

नाशकात खून, कार लुटमार करणार्‍या मुंबईच्या सराईत गुन्हेगाराला अटक

Subscribe

नाशिक शहरात दिवाळीच्या दिवशी एकाचा खून केल्यानंतर पळून जाण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील दहावा मैल परिसरात व्यापार्‍याची इनोव्हा कार लुटणार्‍या मुंबईच्या सराईत गुन्हेगाराला नाशिक ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी कार, देशी बनावटीचे पिस्टल, २ जीवंत काडतुसे, चॉपर, कोयते, स्क्रु ड्रायव्हर जप्त केला आहे. समतानगर, अंधेरी येथील अमन हिरालाल वर्मा (वय ३५) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

१६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २.३० वाजेदरम्यान नाशिक शहरातील व्यापारी उमेश चंद्रकांत गाडे हे दहावा मैल परिसरात ढाब्यावर जेवण करुन इनोव्हा कारने नाशकात येत होते. त्यावेळी चारजण त्यांच्या कारजवळ आले. आम्हाला नाशिकपर्यंत सोडता का, असे म्हणत ते गाडीत बसले. त्यानंतर गाडे यांच्या डोक्याला पिस्टल व धारदार चॉपर लावून हात व डोळ्याला पट्टी बांधत त्यांच्या खिशातील ८ हजार ३२१ रुपये काढून घेत कारसह फरार झाले. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरु केला. कार घेवून फरार झालेले संशयित आरोपी नाशिक शहराच्या दिशेने गेल्याचे तपासात उघडकीस आले. पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. संशयित आरोपी मुंबईत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अंधेरी, वसई-विरार परिसरात दोन दिवस पाळत ठेवली. तपासात चोरी केलेली कार वसई येथील एव्हरशाई इमारतीखाली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. मात्र, पोलिसांची आल्याची चाहूल लागताच कारचालकाने कार भरधाव वेगाने नेण्यास सुरुवात केली असता पोलिसांनी पाठलाग केला. गर्दीचा फायदा चालक कार सोडून पळून गेला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अमन वर्मा यास अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने नाशिकरोड परिसरातील पाच साथीदारांच्या मदतीने कार चोरल्याची कबुली दिली.

- Advertisement -

गुन्हेगारावर मुंबईत विविध गुन्हे

गुन्हेगार अमन वर्मा याने नाशिकरोड येथील साथीदारांच्या मदतीने उपनगर परिसरात १५ नोव्हेंबर रोजी योगेश चायल याचा धारदार शस्त्राने वार करत खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. नाशिक शहरातून पळून जाण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावर पाळत ठेवून दहावा मैल परिसरातून इनोव्हा कार लांबवल्याची उघडकीस आले आहे. अमन वर्मा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -