घरताज्या घडामोडीनाशिक हादरले ! अपहृत ९ वर्षीय मुलाचा खून

नाशिक हादरले ! अपहृत ९ वर्षीय मुलाचा खून

Subscribe

शेजारच्या तरुणावर संशय, पोलीस तपास सुरु

सामनगाव रोडवरील गाडेकर मळ्यातील नऊ वर्षीय मुलाचा अपहरणकर्त्याने सिन्नर येथील डुबेरे गावाच्या परिसरात खून केल्याचे उघडकीस आले आहे. मुलाचा मृतदेह डुबेरे गावातील बंधार्‍यात असल्याचे संशयित तरुणाने पोलिसांना सांगितले. या घटनेमुळे नाशिक जिल्हा हादरुन गेला आहे. रामजी लालबाबू यादव असे मृत मुलाचे नाव आहे.

रामजी लालबाबू यादव याला मंगळवारी (दि.१) शेजारी राहणार्‍या संशयित तरुणाने बरोबर नेल्याचे पालकांनी सांगितले. त्यानंतर तरुण रात्री एकच्या सुमारास घरी आल्यानंतर मुलाच्या पालकांनी रामजीबाब चौकशी केली. त्यावेळी तरुणाने मुलाच्या पालकांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यातून संशय आल्याने पालकांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूरज बिजली यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूरज बिजली यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -