घरमहाराष्ट्रनाशिकमुथूट दरोड्यातील मुख्य सूत्रधाराला अखेर अटक, आंतरराज्य टोळीचा हात

मुथूट दरोड्यातील मुख्य सूत्रधाराला अखेर अटक, आंतरराज्य टोळीचा हात

Subscribe

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मुथूट फायनान्सच्या कार्यालयावरील दरोड्याचा प्रयत्न आणि एकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मुथूट फायनान्सच्या कार्यालयावरील दरोड्याचा प्रयत्न आणि एकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. या दरोड्यामागे आंतरराज्य टोळी कार्यरत असून, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल ही त्यानेच विकत घेतल्याचेही निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी, २४ जूनला दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी गुजरातमधून जितेंद्र विजयबहादूर सिंग राजपूत या मुख्य सूत्रधाराला अटक केली असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहे. नाशिकमधील दरोड्यात जितेंद्रचा भाऊ आकाशसिंग राजपूत, परमेंदर सिंग, पप्पू उर्फ अनुज साहू, सुभाष गौड आणि गुरु आदींचा सहभाग असल्याची कबुली जितेंद्र याने दिली आहे. नांगरे-पाटील म्हणाले, गोळीबारात तांत्रिक अभियंता संजू सॅम्युअलचा दरोडेखोरांना प्रतिकार करत असताना गोळी लागून मृत्यू झाला. त्याच्या शौर्यामुळेच लुटीचा डाव उधळला. नाशिकमधील दरोड्यात जितेंद्रचा भाऊ आकाशसिंग राजपूत, परमेंदर सिंग, पप्पू उर्फ अनुज साहू, सुभाष गौड, गुरू आदींचा सहभाग असल्याची कबुली जितेंद्र याने दिली आहे. तीन दुचाकी दिंडोरीजवळ सापडल्या. दुचाकींचा क्रमांक बोगस व चेसी क्रमांक खोडलेले होते. त्यामुळे तपास करणे मोठे आव्हानात्मक होते. फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. बजाज कंपनीची मदत घेतली गेली. तिथून डिलरकडे सुरतमध्ये पोलीस पोहोचले. तिथून वाहन कसे विक्री झाले याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. मुख्य सूत्रधार जितेंद्रने सुरतमधून दुचाकी विकत घेतली होती. सुरतमध्ये राजपूतच्या घरी पोलिसांनी छापा टाकला. दुसरी दुचाकी तिथून पोलिसांनी ताब्यात घेतली. तिसरी दुचाकी नाशिकचा सुभाष गौड याची असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तो अंबडमध्ये सिक्युरिटीचे काम करायचा. घटना घडल्याच्या दिवशी त्याने मुली व पत्नीला उत्तर प्रदेशात पाठवले होते. सुभाष गौडकडे सर्वजण राहत होते. यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, माधुरी कांगणे, अमोल तांबे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

चार महिन्यांपूर्वी रचला कट

नाशिकमधील दरोड्याचा कट जितेंद्र राजपूत याने फेब्रुवारी २०१९ मध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल राज्यातील कुख्यात गुंडांच्या उपस्थितीत रचला होता. दरम्यान, आकाश राजपूत याच्यावरही बिहार, उत्तरप्रदेश अशा विविध राज्यात खून, दरोडा यांसारखे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारीमुळे त्याच्या आई-वडिलांनीही त्याला घराबाहेर काढून तशी जाहीर नोटिसही काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती.

यांचा सहभाग ठरला महत्त्वपूर्ण

दरोड्याचे धागेदोरे शोधण्यापासून ते आरोपीपर्यंत पोहोचण्यात अत्यंत गुंतागुंतीचा आणि अडथळ्यांचा सामना पोलिस पथकांना करावा लागला. त्यावर मात करत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोपींना अटक केली. त्यात सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक विजय लोंढे आदींसह कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -