घरमहाराष्ट्रनाशिक३ हजार धावपटूंचा मविप्र मॅरेथॉनमध्ये सहभाग; किशोर गव्हाणे विजेता

३ हजार धावपटूंचा मविप्र मॅरेथॉनमध्ये सहभाग; किशोर गव्हाणे विजेता

Subscribe

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे रविवारी आयोजित केलेल्या सहाव्या राष्ट्रीय आणि अकराव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन २०१९ स्पर्धेचे विजेतेपद बुलढाण्याच्या किशोर गव्हाणे याने पटकावले. ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉनमध्ये धावतांना त्याने २ तास २६.३१ मिनीटे अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांकासह मॅरेथॉनचे एक लाख रूपयांचे पारितोषिक मिळविले. कडाक्याच्या थंडीत पहाटे पावणे सहापासून स्पर्धेला सुरुवात झाली. सतरा गटात झालेल्या स्पर्धेत चिमुकल्यांपासून ज्येष्ठ धावपटूंनी सहभाग नोंदविला. महाराष्ट्राची ऑलिम्पिक धावपटू ललिता बाबर हिने स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला. गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकातून स्पर्धेला प्रारंभ झाला. सकाळच्या गुलाबी थंडीत स्पर्धकांना धावताना काहीसा त्रास होत असल्याचे दिसून आले. कडाक्याच्या थंडीतही अबालवृध्दांचा उत्साह दिसून आला. पावणे सहा वाजेला पूर्ण मॅरेथॉनला प्रारंभ झाला.

MVP marathon Nahik participate
मराठा विद्या प्रसारक मॅरेथॉन स्पर्धेत धावताना धावपटू.

बक्षिस वितरण समारंभ रावसाहेब थोरात सभागृहात झाला. या वेळी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल म्हणाले, की प्रत्येक खेळाडूने मनात जिद्द ठेऊन प्रामाणिक प्रयत्नाने आयुष्याची वाटचाल केल्यास यश हमखास मिळते. आयुष्यात चॅलेंज स्वीकारून जीवनाची वाटचाल करावी. महिलांनी देखील नियमित व्यायाम करावा, एखादा छंद जोपासावा असे सांगत आयर्नमन स्पर्धेच्या प्रवास त्यांनी सांगितला.

- Advertisement -

या वेळी विविध १७ गटातील विजेत्यांसह सहभागी धावपटूंना स्पर्धा पूर्ण केल्यानंतर पदक देऊन सन्मानित केले. स्पर्धेसाठी भारतातून उत्तरप्रदेश, राजस्थान, पंजाब, बिहार, हरियाणा, दिल्ली, तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील धावपटू असे तीन हजार स्पर्धक सहभागी झाले. ऑलिंम्पिकपटू ललिता बाबर, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती राघो नाना अहिरे, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षिका शैलजा जैन, संचालक नाना महाले, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. जयंत पवार, अशोक पवार, भाऊसाहेब खातळे, सचिन पिंगळे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेला सुरुवात झाली. सूत्रसंचलन अनिल उगले व क्रीडाधिकारी प्रा.हेमंत पाटील यांनी केले.

सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा गौरव

सुलतान देशमुख, सपना माने, विनिता उगावकर, हुजेब पठाण,रसिका शिंदे व पवन ढोंन्नर यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूं पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात सर्वोच्च सहभागाबद्दलचे प्रथम पारितोषिक जी. एम. डी. आटर्स, बी. डब्ल्यू महाविद्यालय सिन्नर महाविद्यालय यांना तर द्वितीय डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व तृतीय केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयास देण्यात आले.

- Advertisement -

नाशिकचे खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत जातील

क्रीडा क्षेत्रात मुलींची कामगिरी प्रभावी असून मुलींना चूल आणि मुल या पलीकडे विचार करायला शिकवा. मुलींसाठी अवकाश मोकळे करा, असा सल्ला ललिता बाबर यांनी या वेळी दिला. नाशिक जिल्ह्यातून जास्तीत जास्त खेळाडू घडतील, असे सांगत आपण २०२० मध्ये टोकियो येथे होणार्‍या स्पर्धेत सहभाग घेऊन भारतवासीयांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -