नाशिक : पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

मोहन ठाकूर यांची महाराष्ट्र पोलीस अकादमीत तर अजित पाटील यांची अहमदनगर येथे बदली

Nashik
POLICECAP1_1
पोलिस

भारतीय पोलीस सेवा व राज्य पोलीस सेवेतील पोलीस उपअधीक्षक व सहायक पोलीस आयुक्त या संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

अधिकार्‍यांच्या बदलीबाबत प्रशासकीय न्यायाधिकरण, न्यायालयाचे आदेश, निवडणूक आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था विचारात घेऊन पोलीस महासंचालकांनी कार्यवाही करावी, असे गृहविभागाने शासननिर्णयात म्हटले आहे. नियंत्रक अधिकार्‍यांनी बदली झालेल्या अधिकार्‍यांना कार्यमूक्त करावे. अधिकार्‍यांनी बदलीच्या ठिकाणी रूजू होऊन तसा अहवाल शासनास सादर करावा, असेही निर्णयात म्हटले आहे.

बदली झालेले अधिकारी (कंसात बदलीचे ठिकाण)

मोहन ठाकूर (पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी,नाशिक), अजित पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, अहमदनगर ग्रामीण उपविभाग, अहमदनगर), मुकुंद हातोटे (अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), रमेश धुमाळ (अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग).