घरमहाराष्ट्रनाशिकडकोटाच्या ऐतिहासिक कामगिरीला उजाळा

डकोटाच्या ऐतिहासिक कामगिरीला उजाळा

Subscribe

भारत पाक युद्धात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे डकोटा या लष्करी मालवाहू विमानाच्या ऐतिहासिक कामगिरीचे नाशिकही साक्षीदार बनले. या विमानाचे ओझर विमानतळावर आगमन झाले. ओझर विमानतळावर डकोटा हे ऐतिहासिक आणि दुर्मिळ विमानही दाखल झाल्याने ओझरची धावपटटीही इतिहासाची साक्षीदार बनली.

भारत पाक युद्धात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे डकोटा या लष्करी मालवाहू विमानाच्या ऐतिहासिक कामगिरीचे आज नाशिकही साक्षीदार बनले. या विमानाचे ८ फेब्रुवारीस ओझर विमानतळावर आगमन झाले. ओझर विमानतळावर आजवर सर्वात मोठे बोईंग विमान उतरवण्यात आले होते. त्यानंतर डकोटा हे ऐतिहासिक आणि दुर्मिळ विमानही दाखल झाल्याने ओझरची धावपटटीही इतिहासाची साक्षीदार बनली.

भारतीय वायुसेनेत डकोटा १९३० मध्ये दाखल झाले. दुसर्‍या महायुद्धासह १९४७ मध्ये भारत पाकिस्तान युद्धात तसेच लडाख आणि इशान्य भागात या विमानाने महत्वपूर्ण कामगिरी केली. १९४७ मध्ये पाकिस्तानने जम्मू काश्मीवर हल्ला केला. काश्मीर वाचवण्यात डकोटाने मोलाची भूमिका बजावली. शीख रेजीमेंटच्या जवानांना डकोटाने श्रीनगरला पोहोचवले. लेहमधील ११ हजार ५०० फुट उंचीवरील धावपटटीवर उतरणारे हे पहिले विमान आहे. राज्यसभा सदस्य राजू चंद्रशेखर यांचे वडील एम.के.चंद्रशेखर हे हवाई दलात एअर कमोडोर होते. त्यांनी अनेकदा या विमानाचे सारथ्य केले. त्यांनतर हे विमान हवाई दलास भेट देण्यात आले. २०११ पासून या विमानाचे आधुनिकीकरणासाठी प्रयत्न सुरू होते. सहा वर्षाच्या दुरुस्तीनंतर हे विमान हवाई दलास भेट देण्यात आले. बेंंगळुरूमध्ये २० ते २४ फेब्रुवारी दरम्यान होणार्‍या एअरो इंडिया या जागतिक प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी हे विमान दिल्लीहून बेंगळुरूला चालले आहे. मात्र डकोटा रात्री उडडाण करू शकत नाही. त्यामुळे आज या विमानाला ओझर येथे थांबा देण्यात आला. शनिवारी सकाळी ११ ला हे विमान बेंगळुरूकडे उडडाण घेणार आहे.

- Advertisement -

दुर्मिळ लढावू विमानांपैकी डकोटा एक

१९४० ते १९८० या काळात डकोटा मालवाहू विमानाचा मोठया प्रमाणात वापर केला. साडेतीन दर्शकांपूर्वी हवाई दलाच्या सेवेतून डकोटा निवृत्त झाले. त्याच्या कामगिरीला उजाळा देण्यासोबत ते जतन करण्यासाठी राज्यसभा सदस्य राजीव चंद्रशेखर यांनी भंगारात हे विमान खरेदी करून ब्रिटनमध्ये त्याची दुरूस्ती केली. आज हवाई दलात दुर्मीळ लढावू विमानांपैकी डकोटा एक आहे. – समीर बोराडे, एअर कमोडोर, एचएएल

डकोटाचे मुळ नाव परशुराम

व्हीपी-905 प्रकारातील हे विमान असून त्याची प्रथम बांधणी १९४४ मध्ये करण्यात आली. दोन इंजिन असलेले हे विमान दिवसा उडाण भरू शकते. हे विमान २०११ मध्ये भारतीय हवाई दलास भेट देण्यात आले. या विमानाला नाव डीसी डकोटा या नावाने ओळखले जात असले तरी त्याचे मूळ नाव परशुराम असल्याचे विमानावर छापण्यात आलेल्या नावावरून दिसून आले.

डकोटा विमानाची वैशिष्टै

  • १,९३० मध्ये भारतीय वायुसेनेत झाले दाखल
  • भारत पाक युद्धात महत्वाची भूमिका
  • इंग्लंडमध्ये निर्माण झालेल्या विमानाची किंमत ५८० युरो
  • ३३३ किलोमीटर प्रतितास वेग
  • साडेसात हजार किलो वजनाचा भार वाहून नेण्याची क्षमता
  • ३,७३६ लिटर इंधन टाकी क्षमता
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -