राज्यात सर्वाधिक थंडी नाशकात; द्राक्ष, उसावर बर्फाची चादर

शहरात थंडीची लाट आल्याने दिवसाही नाशिककरांना उबदार कपडयाचा आधार घ्यावा लागला.

Nashik
nashik-winter

हुडहुडी भरविणार्‍या थंडीने नाशिककर गारठले असून राज्यात सर्वाधिक थंडीची नोंद नाशिक जिल्ह्यात शुक्रवारीही  झाली. नाशिकचा पारा १२.६ अंश सेन्ल्सिअसवरून गुरुवारी थेट ५.७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी६.९ अंश सेन्ल्सिअस तापमानाची नोंद करण्‍यात आली. तर द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या निफाड तालुक्यात द्राक्षबागांसह उसावर अंक्षरशः बर्फाची झालर अच्छादली गेली होती. निफाडचा पारा १.८ अंशांपर्यंत खाली घसरला.

मागील वर्षी डिसेंबरमध्ये ७.५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. यावर्षी तर पारा थेट ५.७ अंशांपर्यंत खाली घसरल्याने नाशिकमध्ये थंडीची लाटच आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ उतार अनुभवयास येत आहेत. मागील दोन दिवसांपूर्वी १४ अंशांवर गेलेला तापमानाचा पारा गुरूवारी १२.६ अंशावरून थेट ५.७ अंशापर्यंत खाली घसरला. नाताळ दरम्यान शहरातील तापमानाचा पारा कमालीचा खाली उतरत असल्याचा आजवरचा अनुभव आहे.

शहरात थंडीची लाट आल्याने दिवसाही नाशिककरांना उबदार कपडयाचा आधार घ्यावा लागला. मंगळवारी पारा १४ अंशांपर्यंत वर सरकल्यामुळे नाशिककरांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला होता. तर किमान तापमानातही वाढ होऊन पारा तीशीपर्यंत पोहचला होता. मात्र गुरूवारी अचानक कमाल आणि किमान तापमानात मोठी घट झाली. तीशीपार गेलेले कमाल तापमान थेट २६ अंशांपर्यंत खाली आले. निफाड तालुक्यातील कृषी संशोधन केंद्रावर १.८ अंश तापमनाची नोंद झाली आहे.

मागील १६ वर्षातील डिसेंबर महीन्यातील तापमान

वर्ष  तापमान 
२००३ ५.४
२००४ ८.
२००५ ६.
२००६ ६.६
२००७ ७.२
२००८ ३.५
२००९ ७.८
२०१० ५.४
२०११ ४.४
२०१२ २.७
२०१३ ४.४
२०१४ ६.१
२०१५ ५.४
२०१६ ५.५
२०१७ ५.८
२०१८ ५.७

द्राक्ष उत्पादक चिंतेत

उगांव, शिवडी, सोनेवाडी भागात थंडीने द्राक्षमण्यांची फुगवण थांबली आहे. द्राक्षमण्यांना तडे जाऊन नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे. भारनियमनामुळे पाणी देणेही शक्य नसल्याचे द्राक्ष निर्यातदार संजय गवळी यांनी सांगितले.

..म्हणून वाढली थंडी

उत्तरेकडे जम्मू काश्मीर, हिमाचलमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्याने तापमानात घट होत असल्याचे दिसून येत आहे. पुढील तीन दिवस नाशिकसह राज्यात थंड वारे वाहणार असल्याच ाअंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.