घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक-कल्याण लोकल फेब्रुवारीपासून

नाशिक-कल्याण लोकल फेब्रुवारीपासून

Subscribe

फेब्रुवारीच्या पहील्या आठवडयात धावणार लोकल

नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईला जोडणारी लोकल रेल्वेसेवा सुरू होणार असून, ताशी १०० किमी वेग असणारी ही लोकल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात नाशिककरांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे नाशिक कल्याण हे अंतर अडीच तासांत प्रवास करता येणार आहे. या लोकलचे कोच चेन्नईच्या कारखान्यात तयार होत असून ३० जानेवारीपर्यंत हे कोच कुर्ला वर्कशॉपमध्ये दाखल होणार आहेत. नाशिकच्या सर्वांगीण विकासाला या लोकलमुळेे चालना मिळणार आहे.

नाशिक ते मुंबई प्रवासासाठी अनेक रेल्वेगाड्या आहेत. मात्र, या गाड्या प्रत्येक स्टेशनवर थांबत नाहीत. अनेक प्रवाशांना काही मुख्य स्थानकावर उतरून लहान स्थानकावर जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकच्या जनतेसाठी रेल्वे विभागाकडे कसारा ते नशिक लोकलची मागणी केली होती. मात्र, कसारा ते नाशिक लोकल सुरू केल्यास ही लोकल तोट्यात जाईल, असा निष्कर्ष रेल्वेने काढला होता. म्हणून रेल्वे बोर्डाने या गोष्टीचा अभ्यास करून रेल्वे अधिकारी, प्रवासी यांच्याकडून सूचना मागवल्या होत्या. या सूचना विचारात घेऊन तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या सेवेला हिरवा कंदील दाखवला होता. नाशिककरांच्या सेवेत ही लोकल फेब्रुवारीमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत दिले आहेत. चेन्नई येथील कारखान्यात गुरुवारी हेमंत गोडसे यांनी भेट देऊन पाहणी केली. हे कोच जानेवारी अखेर कुर्ला वर्कशॉपमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर पाच ते सहा दिवस येथे उर्वरित काम पुर्ण करून ७ फेब्रुवारीनंतर ही लोकल धावण्यास सज्ज होणार आहे.

- Advertisement -

अशा असतील सुविधा

बारा डब्यांच्या लोकलमध्ये महीलांसाठी फर्स्ट क्लास स्पेशल कोच, अपंगांसाठी एक कंपार्टमेंट राहणार आहे. तीन कोचेस मिळून एक इंजिन राहणार आहे.

विकासाला चालना

या लोकलसेवेमुळे दळणवळण सुलभ होउन शेतकरी, उद्योजकांना याचा फायदा होणार आहे. यामुळे इगतपुरी, घोटी, लहवीत, देवळाली कॅम्प आणि नाशिकच्या शेतकरी, उद्योजकांना दळणवळणाची मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
– खासदार हेमंत गोडसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -