घरमहाराष्ट्रनाशिकअनैतिक संबंधाचा संशय; मुलाने वडिलांच्या डोक्यात घातला पाटा

अनैतिक संबंधाचा संशय; मुलाने वडिलांच्या डोक्यात घातला पाटा

Subscribe

पत्नी आणि वडिलांमध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन आरोपीने हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पत्नी आणि वडिलांमध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन मुलानेच वडिलांच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड परिसरातील गौतमनगरमध्ये गुरुवारी, २८ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास घडली. वडिलांची हत्या करुन आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे नाशिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अनैतिक संबंधांच्या संशयावरुन हत्या

नाशिकरोडवरील महाराष्ट्र हायस्कुलमागे गौतमनगरात कुटुंबियांसोबत राहणाऱ्या सिध्दार्थ एकडे याने हा खून केला. सिध्दार्थला त्याची पत्नी आणि वडील भगवान एडके (६५) यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यावरुन सिद्धार्थचे त्याची पत्नी आणि वडील यांच्याशी नेहमीच भांडण व्हायचे. गुरुवारी पहाटे ४.४५ वाजता वडील झोपेत असताना सिद्धार्थने घरातील दगडाचा पाटा वडिलांच्या डोक्यात टाकून त्यांची हत्या केली.

- Advertisement -

पोलिसांसमोर झाला हजर

वडिलांच्या हत्येनंतर आरोपी सिध्दार्थने थेट उपनगर पोलीस ठाणे गाठले. त्याने पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. उपनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -