घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक मनपा: भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी, शिवसेनेत दोघांमध्येच स्पर्धा

नाशिक मनपा: भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी, शिवसेनेत दोघांमध्येच स्पर्धा

Subscribe

नाशिक महापालिकेत भाजपचे बहुमतापेक्षा अधिक नगरसेवक असल्याने या पक्षातील अनेक नगरसेवकांना महापौरपदाचे डोहाळे लागले आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींसमोरही नक्की कुणाला उमेदवारी द्यावी याचा पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे शिवसेनेत विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते आणि सुधाकर बडगुजर या दोघांचीच नावे उमेदवारीच्या स्पर्धेत आहे. हे दोघांसह सेनेचे पदाधिकारी भाजपचे नगरसेवक फोडण्याच्या प्रयत्नात असल्याने निवडणूक कमालीची चुरशीची होणार असल्याचे दिसते. महापौरपदाची निवडणूक येत्या २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता महापालिकेच्या मुख्यालयात होत आहे.

भाजपच्या गोटातील हालचालींचा कानोसा घेतला असता महापौरपदाच्या उमेदवारीसाठी ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कुलकर्णी यांच्या नावास आमदार देवयानी फरांदे आणि आमदार सीमा हिरे यांनीही संमती दर्शवल्याचे बोलले जाते. याशिवाय दिनकर पाटील यांनीही उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत सीमा हिरे यांना निवडून देण्यात आपला मोठा हात असल्याचा दावा करीत पाटील यांनी महापौरपद पक्षाकडे मागितले आहे. मनसेच्या सत्ताकाळात महापौरपदाने दोनदा हुलकावणी दिलेल्या शशिकांत जाधव यांनी आता भाजप श्रेष्ठींकडे ‘फिल्डिंग लावली आहे. ‘मी नाशिककर’ या संस्थेनेही रविवारी स्वतंत्र बैठक घेत जाधव यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. या संस्थेत उद्योजक, पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

हे वाचा – नाशिकचे भाजपचे सहा नगरसेवक नॉट रिचेबल

आजवर कोणत्याही समितीचे पद न मिळालेले भाजपचे नगरसेवक योगेश (मुन्ना) हिरे यांनीही महापौरपदासाठी मोर्चेबांधणी केली आहे. आ. सीमा हिरे यांचे ते दीर आहेत. त्यांच्या पाठीमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही ताकद असल्याचे बोलले जाते. स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौर आहेर-आडके यांनीही महापौरपदाच्या उमेदवारीवर दावा केला आहे. मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारीसाठी दावा केला होता. त्यांच्यासह माजी आमदार वसंत गीते यांनाही भाजपने उमेदवारी नाकारली. त्यानंतर नाराज झालेले गीते हे अन्य पक्षात जातात की काय अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट झाल्यानंतर त्यांनी विद्यमान उपमहापौर प्रथमेश गीते यांना महापौरपद देण्याचे कबुल केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वसंत गीते यांनी सबुरीने घेतले.

- Advertisement -

स्थायी समिती सभापतीपदाच्या उंबरठ्याजवळ गेलेले नगरसेवक गणेश गीते यांचेही नाव महापौरपदासाठी चर्चेत आहेत. गीते यांनी आपल्या वडीलांच्या प्रकृती अस्वस्थामुळे उमेदवारी करण्यास नकार दिल्याचे आज सांगण्यात येत असले तरी ऐनवेळी त्यांचे नाव देखील महापौरपदाच्या उमेदवारीसाठी पुढे येऊ शकते. काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर लगेचच स्थायी समिती सभापतीपद मिळविणारे शिवाजी गांगुर्डे आणि ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे.


हे पाहा – शिवसैनिकाने केली देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावाची पोलखोल

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -