नाशिक महापालिकेने संपूर्ण इमारतच केली प्रतिबंधित

प्रतिबंधित क्षेत्र नियमाचा अतिरेक, स्वस्थ रहिवाशांना मात्र मनस्ताप

ContainmentZone

शहरातील कॉलेजरोड भागात असलेल्या विसे मळा परिसरात असलेल्या एका इमारतीत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिकेने ती संपूर्ण इमारतच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्याची घटना पुढे आली आहे. सरकारकडून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असताना, पालिकेच्या या अनागोंदी कारभारामुळे मात्र त्या इमारतीमधील इतर स्वस्थ रहिवाशांना मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केलं होतं. मात्र, आता परिस्थिती काहीशी नियंत्रणात आल्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झालीय. कोरोनाबाधित व्यक्ती सापडल्यानंतर प्रारंभी संपूर्ण परिसर प्रतिबंधित केला जात होता. नंतर केवळ इमारत आणि आता केवळ कोरोनाबाधिताचं घरच प्रतिबंधित केलं जातं. असं असतानाही कॉलेजरोडच्या विसे मळा भागातली एक इमारत महापालिकेने संपूर्ण प्रतिबंधित केलीय. एकिकडे नागरिकांचं प्रबोधन करायचं आणि दुसरीकडे नियमांचा अतिरेक असाच अनुभव अनागोंदी कारभारामुळे नागरिक घेताहेत.