घरताज्या घडामोडीचुंभळेंच्या डंपरने चिरडले कर्मचार्‍याला

चुंभळेंच्या डंपरने चिरडले कर्मचार्‍याला

Subscribe

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या डंपरने शुक्रवारी (दि.४) सकाळी ८ वाजेदरम्यान पाथर्डी फाट ते पाथर्डी गाव रस्त्यावरील सेलिब्रेशन हॉटेलजवळ महापालिकेच्या सफाई कर्मचार्‍याला धडक दिली. या घटनेत वडाळा येथील अजय तारकर (वय ४०) या सफाई कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अजय तारकर हे नाशिक महापालिकेच्या सिडको विभागातील सफाई कर्मचारी आहेत. ते शुक्रवारी नेहमीप्रमाणे पाथर्डी गाव रस्त्यावर साफसफाईचे काम करत होते. त्यावेळी शिवाजी चुंभळे यांचा भरधाव डंपरने तारकर यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. ही बाब इंदिरानगर पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -