घरमहाराष्ट्रनाशिकमहाजनादेश यात्रेसाठी नाशिक महापालिकेची मोठी कारवाई

महाजनादेश यात्रेसाठी नाशिक महापालिकेची मोठी कारवाई

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेली महाजनादेश यात्रा बुधवारी नाशिकला दाखल होणार आहे. या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे. महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरुवारी नाशिकमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात जोरदार बॅनरबाजी सुरु आहे. या बॅनरबाजीच्या विरोधात नाशिक महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने तब्बल ७५ विना परवाना होर्डिंग हटवले आहेत. महापालिकेने तीन जणांवर गंभीर गुन्हे देखील दाखल केले आहेत. याशिवाय आणखीन चार जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. विशेष म्हणजे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या लोकांमध्ये नामांकित नगरसेवकांचे देखील नावे आहेत. त्यामुळे सध्या बॅनरच्या कारवाईमुळे नाशिकमधील वातावरण तापले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -