घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकरोड रेल्वेस्थानकाला स्वच्छता पुरस्कार

नाशिकरोड रेल्वेस्थानकाला स्वच्छता पुरस्कार

Subscribe

मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकांना विविध प्रकारच्या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. सोलापूर, नागपूर, मुंबई, पुणे, भुसावळ या विभागात एकुण २० पुरस्कार जाहीर झाले आहेत.

श्रीधर गायधनी

मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकांना विविध प्रकारच्या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. सोलापूर, नागपूर, मुंबई, पुणे, भुसावळ या विभागात एकुण २० पुरस्कार जाहीर झाले आहेत. सुरक्षेबाबत सोलापूर, तर नाशिकरोड रेल्वे स्थानकाला स्वच्छतेचा सर्वोत्कृष्ठ पुरस्कार मिळाला आहे. मुंबईने इंजिनिअरींग, स्टोअर्स, वैद्यकीय तर पुणे विभागाला मॅकेनिकल, नागपूरला बेस्ट किप गार्डनिंग आदी पुरस्कार जाहीर करण्यात आले.

- Advertisement -

मध्य रेल्वेच्या वतीने उत्कृष्ठ काम करण्या-या विविध विभागांना दरवर्षी चषक व पुरस्कार जाहिर केले जातात, मध्य रेल्वेच्या मुंबई,पुणे,भूसावळ,सोलापूर व नागपूर असे पाच विभागातील २० वेगवेगळ्या विभाग व रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. नाशिकरोड येथील रेल्वे स्थानकातील स्वच्छतेच्या बाबतीत दखल घेत दिल्ली मुख्यालयातून आलेल्या पथकाच्या पहाणीत पथकाने स्वच्छता करणा-या कामगारांचे वेतन, भविष्य निर्वाहनिधी, विमा यांचे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा होतात की नाही याची खातर जमा केली होती. सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे अपघात टाळण्यासाठी मंडल प्रबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे ट्रॅक, मशिन, ओव्हरहेड तारा, सिग्नल, व वाहतुकीच्या दृष्टीने तंतोतंत पालन करत काटेकोरपणे तपासणी केली जाते व तृटींचा निपटारा तात्काळ केल्याचा अहवाल समितीने सादर केला असल्याने सोलापूरला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकाला स्वच्छतेच्या बाबतीत मिळालेला पुरस्कार हा नाशिकच्या दृष्टिने अभिमानाची गोष्ट आहे,रेल्वे व्यवस्थापनाला प्रवाशांच्या सहकार्याची जोड मिळाल्याने नाशिकरोड रेल्वे स्थानक आयएसओ १४००१ चे मानांकन मिळविण्याचा पहिला टप्पा पुर्ण केला आहे. पुणे विभागाला पंक्च्युएट पूरस्कार मिळाला आहे.

रेल्वे स्थानकांची क्रमवारी…

- Advertisement -

सुरक्षा सोलापूर विभाग, वाणिज्य नागपूर विभाग, इलेक्ट्रीकल मुंबई विभाग, इंजिनिअरींग भुसावळ आणि मुंबई, मॅकेनिकल पुणे आणि मुंबई, परिचालन (आपरेटींग) नागपूर विभाग, सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन मुंबई, अकाऊंट सोलापूर, कार्यालयीन कामकाज भुसावळ विभाग, वैद्यकीय मुंबई विभाग, सिक्युरीटीसाठी भुसावळ विभाग, स्टोअर्स मुंबई, पंच्युएट पुणे, कार्य अचुकता नागपूर, वर्कशॉप कार्य अचुकता भूसावळ ईएल डब्ल्यू विभाग, बेस्ट डिविजन स्वच्छता नागपूर, स्वच्छता नाशिकरोड स्टेशन, बेस्ट किप गार्डन अजनी स्टेशन नागपूर (प्रथम), बेस्ट किप गार्डन घोरा डोंगरी स्टेशन (द्वितीय)

प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद

चार फलाटाचा परिसर असलेल्या रेल्वेस्थानकावर स्वच्छता राखण्याचे काम रेल्वे व्यवस्थापन करत आहेच, परंतू याठिकाणी रोज हजारों प्रवाशांची ये-जा असते, त्यांनीही स्वच्छतेच्या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुरस्कार प्राप्त झाला. त्यामुळे प्रवाशांना विशेषता धन्यवाद देणे आवश्यक आहे. -कुंदन महापात्रा, मुख्य वाणिज्य निरीक्षक

 त्रुटी असल्यास तत्काळ दूर

रेल्वे अपघात होऊ नये याकडे सर्वांच विभागांचा सहभाग आहे, वेळोवेळी तपासणी करतांना त्रुटी असल्यास तत्काळ दूर करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जातात. यामुळे रेल्वे अपघातांची संख्या कमी झाली आहे, या सर्व गोष्टी करतांना प्रवाशांच्या सुरक्षेलाही प्रथम प्राधान्य दिल्याने पुरस्कार प्राप्त झाला आहे. – प्रदीप हिरडे, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक, सोलापूर विभाग, मध्य रेल्वे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -