प्रदूषित औद्योगिक शहरांमध्ये नाशिक ४१ व्या स्थानी

राष्ट्रीय हरित लवादाकडून यादी प्रसिद्ध

Nashik
AirPollution
प्रातिनिधिक फोटो

रणार्‍या १०० प्रमुख औद्योगिक शहरांची यादी राष्ट्रीय हरित लवादाने प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये राज्यातील चंद्रपूर, औरंगाबाद, डोंबिवली, नाशिक, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, महाड या सात औद्योहिक शहरांचा समावेश असून नाशिक ४१ व्या स्थानी आहे. हरित लवादाने केंद्रीय वन व पर्यावरण विभागाला औद्योगिक क्षेत्रांमधील प्रदूषणाची स्थिती सुधारण्यासाठी कृती आराखडा तयार करावा व त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण प्रदूषण निर्देशांकानुसार प्रदूषण करणार्‍या औद्योगिक शहरांची क्रमवारी ठरविली आहे. यामध्ये सर्वाधिक तारापूरमधील प्रदूषणाचा निर्देशांक ९३.६९ आहे. प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने सूचना केल्या आहेत. प्रदूषण करणार्‍या उद्योगांवर कारवाई करावी, नुकसानभरपाई वसूल करावी, असे निर्देश दिले आहेत. जलप्रदूषण करणार्‍या उद्योगांची सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला जोडणी असावी. हवा आणि पाणी प्रदूषण नियंत्रण, घातक घनकचरा संदर्भात सर्व कायद्यांचे पालन काटेकोरपणे व्हावे, असे १० जुलै रोजी झालेल्या सुनावणीच्या निर्णायात हरित लवादाने म्हटले आहे.

केंद्रीय व राज्यस्तरीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय परीक्षण समितींच्या माध्यमातून औद्योगिक परिसरातील प्रदूषण करणार्‍या घटकांचे गुणधर्म, प्रदूषणामुळे त्रास होणार्‍या नागरिकांची संख्या, उच्च धोका घटकांचा समावेश या निकषानुसार प्रदूषण करणार्‍या औद्योगिक शहरांचा निर्देशांक ठरवण्यात येतो. निर्देशांक ७० हून अधिक असणार्‍या औद्योगिक क्षेत्राला ‘गंभीर प्रदूषित क्षेत्र’, ६० ते ७० निर्देशांक असणार्‍या क्षेत्रांना ‘तीव्र प्रदूषित क्षेत्र’ असे घोषित केले जाते.