घरमहाराष्ट्रनाशिकशिष्यवृत्ती अर्ज तीन दिवसांत मंजूर करा

शिष्यवृत्ती अर्ज तीन दिवसांत मंजूर करा

Subscribe
जिल्हाधिकार्‍यांनी शिक्षण संस्थांना खडसावले
नाशिक शिष्यवृत्तीचे अर्ज शिक्षण संस्थांनी प्रलंबित ठेऊ नये. अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरतांना अडचणी येत असून महाविद्यालयांनी यासाठी व्यवस्था करून अडचणी दूर कराव्यात. यंदा कुठल्याही स्थितीत जानेवारी अखेरपर्यंतच विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करावयाची आहे. यामुळे शिक्षण संस्थांनी आपल्याकडील प्रलंबित शिष्यवृत्तीचे अर्ज तीन दिवसांत मंजूर करावे. यासाठी कुठलीही सबब ऐकुन घेतली जाणार नसल्याचे  जिल्हाधिकार्‍यांनी सर्वच शिक्षण संस्था चालकांना खडसावत या कामाची गती वाढविण्याचेही आदेश दिले.
राज्याच्या सचिवांकडूनच शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची प्रक्रीया गतिमान करण्यासाठी आढावा घेण्यात येणार आहे. ऐनवेळी गडबड, कुठलीही अडचण नको, म्हणून जिल्हाधिकार्‍यांनीही तयारीसाठी समाजकल्याण विभाग, तंत्रशिक्षण विभाग आणि सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांतील शिष्यवृत्तीची स्थिती काय आहे ? हे जाणून घेण्यासाठी  बैठक घेतली. दरवर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यावरुन शासन व प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागते.  शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्याने त्यांचेही अभ्यासाकडे काहीसे दुर्लक्ष होते. त्याची यंदा पुनरावृत्ती होऊ नये. तसेच हे वर्ष निवडणुकीचे असल्याने कुठल्याही स्थितीत जानेवारी अखेरपर्यतच विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यासाठी जिल्ह्यात साधारणत: ८० हजार मागासवर्गीय अर्थात शिष्यवृत्ती पात्र  विद्यार्थ्यांपैकी ५० हजारावर विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन झाले असले तरीही ३० हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांचे अद्याप अर्जच भरुन झालेले नाही. त्यांचा प्रस्ताव शिक्षण संस्थांच्याच स्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी सर्वाधिक अर्ज प्रलंबित असलल्या संस्थांचा चांगलाच समाचार घेत तत्काळ अर्ज मंजूर करण्याचे आदेश दिले. तीन दिवसांत अर्ज निकाली न काढल्यास कुठलीही सबब ऐकून घेतली जाणार नसल्याचेही खडसावल्याने या संस्थाचेही धाबे दणाणले आहे. डीबीटीचे हे दूसरेच वर्ष असल्याने ही संपूर्ण प्रक्रीया समजून घेताना विद्यार्थ्यांनाही अर्ज भरताना अडचणी येत आहे. महाविद्यालयांनीच अर्ज भरण्याची व्यवस्था करावी, असे स्पष्ट आदेशही त्यांनी दिले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -