घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या ‘जिनिअस’ची जागतिक स्तरावर छाप

नाशिकच्या ‘जिनिअस’ची जागतिक स्तरावर छाप

Subscribe

तुर्की येथे १ आणि २ डिसेंबर रोजी झालेल्या मेमोरियाड मेंटल मॅथ आणि मेमरी फेडरेशनतर्फे ‘तुर्की ओपन चॅम्पियनशिप’ स्पर्धा झाली. भारतीय जिनिअस किड संघाने ओपन आणि किडस प्रकारात ४१ पदके आणि ५ सुवर्ण चषक मिळवत ही स्पर्धा जिंकली.

इस्तान्बुल तुर्की येथे आयोजित १२ व्या ‘तुर्की ओपन चॅम्पिअनशिप २०१८’ या स्पर्धेत नाशिकच्या सात जिनिअसने बुध्दिमत्तेची चमक दाखवत दोन जागतिक विक्रम, आठ सुवर्ण चषक आणि पंधरा सुवर्ण पदकांची कमाई केली. जागतिक स्पर्धेत नाशिकचे नाव कोरणार्‍या या सात छोटया जिनिअसचा अशोका ग्लोबल अकॅडमी अर्जुननगर, येथे अशोका एज्युकेशन फाउंडेशन आणि जिनिअस किड्सतर्फे गौरव करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी स्पर्धेतील काही भागाचे सादरीकरण करून उपस्थितांना अचंबित केले.

स्पर्धेत सात विद्यार्थींनी घेतला होता सहभाग

तुर्की येथे १ आणि २ डिसेंबर रोजी झालेल्या मेमोरियाड मेंटल मॅथ आणि मेमरी फेडरेशनतर्फे ‘तुर्की ओपन चॅम्पियनशिप’ स्पर्धा झाली. भारतीय जिनिअस किड संघाने ओपन आणि किडस प्रकारात ४१ पदके आणि ५ सुवर्ण चषक मिळवत ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत नाशिकमधून जिनिअस किडस अ‍ॅकेडमीमधून सात विद्यार्थी सहभागी झाले. आर्यन शुक्ल, गार्गी जोशी- अशोका स्कूल, अरुंधती पताडे- होरायझन अ‍ॅकेडमी, तनुश्री जगताप- अशोका स्कूल, रोहिणी शिरडकर, दुर्वा माळी- रचना विद्यालय, समृद्धी शेवाळे न्यू मराठा विद्यालय या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. आर्यन शुक्ल, गार्गी जोशी, अरुंधती पताडे यांनी दोन जागतिक विक्रम नोंदवून ८ सुवर्णचषक, १५ पदके मिळविली. तनुश्री जगताप, रोहिणी शिरडकर, दुर्वा माळी, समृद्धी शेवाळे यांनी पहिल्या दहा क्रमांकांमध्ये येऊन विशेष मानांकन प्राप्त केले. नितीन जगताप आणि वैशाली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयारी केली होती. तसेच त्यांना जिनिअस किड्स, इंडियाचे संस्थापक युजेबियस नोरोहा यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले होते. क्लिष्ट गणिते, फ्लॅश अँझान या सर्वांत अवघड विषयाची स्पर्धा, मेंटल मॅथ स्पर्धांचा यात समावेश होता. या विद्यार्थ्यांना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते गौरविले. या वेळी अशोका ग्रुपचे अशोक कटारिया, आशिष कटारिया आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -