निफाडचा पारा ० अंशावर; द्राक्ष बागांना फटका

नाशिकमध्ये थंडीचा कहर झाल्याने नाशिकर गारठले असून तापमान ० अंश सेल्सियस वर गेले आहे. तर याचा फटका द्राक्ष बागांना देखील बसला आहे.

Nashik
nashik temperature drop 0 degree celsius
निफाडचा पारा ० अंशावर

जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेशासह उत्तरेकडील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीचा परिणाम नाशिक जिल्ह्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात होत आहे. निफाडमध्ये थंडीने अक्षरश: कहर केला आहे. निफाड तालुक्यातील उगाव येथे पारा ० अंश सेल्सिअस गेल्याने निफाडचे काश्मीर झाले आहे. तर कसबे सुकेना येथे १ अंश सेल्सिअस तापमान झाले आहे. तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात २.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. हवेतील गारव्यामुळे निफाड तालुका गारठून निघाला आहे.  तर याचा फटका द्राक्ष बागांना बसला आहे.

गहू संशोधन केंद्रात २.८ अंश सेल्सिअस

गेल्या तीन आठवड्यापासून निफाडचा पारयात सातत्याने चढउतार होत आहे.  मागील आठवड्यात सोमवार ते बुधवार हवेतील उष्णता वाढल्याने थंडीचा जोर ओसरला होता. मात्र गुरुवारपासून पाऱ्यात लक्षणीय घट झाल्याने निफाड तालुक्यातील नागरिक गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. या हंगामातील थंडीत उगाव येथे निच्चांक ० अंश सेल्सिअस वर गेल्याने द्राक्ष उत्पादांवर परिणाम झाला आह. या थंडीत उगाव येथे निच्चांकी असा द्राक्ष उत्पादक शेतकरी यांच्या बागात असलेल्या तापमानाच्या मीटरवर  ० अंश सेल्सिअस, कसबे सुकेणा येथे ० अंश सेल्सिअस  किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात २.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

द्राक्ष हंगामाला ब्रेक

निफाड तालुक्यात राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली असून या थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून उब मिळवत आहेत. या वाढत्या थंडीमुळे कसबे सुकेना परिसरातील पुदिना पिकाच्या पानांवर दवबिंदू गोठून बर्फ झाल्याचे दिसले आहे. उगाव, शिवडी खेडे, वनसगाव, खडक माळेगाव, रानवड आदी भागांत डिसेंबर महिन्याच्या सुरुवाती पासून कडाक्याची थंडीपडल्याने  द्राक्ष मण्यांना मोठ्या प्रमाणात तडे जात असून द्राक्ष हंगामाला ब्रेक लागला आहे, त्यामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात सापडणार आहे.


वाचा – पुण्यात हुडहुडी; पारा ५.९ अंशांवर


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here