घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक : निफाडनजीक कादवा नदीत ट्रक कोसळून अपघात; चालकाचा मृत्यू

नाशिक : निफाडनजीक कादवा नदीत ट्रक कोसळून अपघात; चालकाचा मृत्यू

Subscribe

नाशिककडून निफाडला जाताना ट्रकला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे.

अपघातांमुळे जीव गमवावा लागणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना असताना नाशिककडून निफाडला जाणाऱ्या रस्त्यावर पुन्हा एकदा अपघात झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून नाशिककडून निफाडला जाणारा मालवाहू ट्रक कादवा नदीच्या पुलावरुन जात असतांना पुलाचे लोखंडी कठडे तोडून कादवा नदीपात्रात कोसळून हा अपघात झाला.

नेमके काय घडले?

नाशिककडून मालवाहू ट्रक रात्री निफाडला निघाला होता. या ट्रकमध्ये भंगाराचे सामान भरलेले होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा ट्रक कादवा येथे नदीच्या पुलावर पोहोचला. त्यादरम्यान हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे कादवा नदीवरील २० ते २२ लोखंडी सुरक्षा कठडे पूर्णत: तुटले आहेत. या अपघातामुळे या पुलावरुन वाहतूक करणं धोकादायक असल्याचं समोर आले आहे.

- Advertisement -

वाचा – २०१८ अपघाताचे वर्ष; ९ हजार ५०० लोकांचा अपघाती मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -