घरमहाराष्ट्रनाशिकऑक्टोबरपासून नाशिक- गोवा विमानसेवा

ऑक्टोबरपासून नाशिक- गोवा विमानसेवा

Subscribe

पर्यटन क्षेत्राला मिळणार चालना

ओझर विमानतळाहून नाईट लँण्डिंगला परवानगी मिळाल्यानंतर स्पाइसजेट कंपनीने नाशिकहून गोव्यासाठी विमानसेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. साधारणपणे १८ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू होण्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. सध्या उडाण योजनेंतर्गत नाशिकहून अहमदाबाद आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू असून त्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. बोईंग विमानद्वारे ही सेवा दिली जाणार असून हैदराबाद-नाशिक-गोवा आणि गोवा-नाशिक-हैदराबाद सेवा, अशी ही सेवा असेल यामुळे पर्यटनवाढीस चालना मिळणार आहे.

नाशिकहून उडाण योजनेअंतर्गत अहमदाबाद आणि हैदराबादसाठी सेवा सुरू झाली. दिल्लीसाठी सेवा देणारी जेट एअरवेज कंपनी आर्थिक अडचणीत सापडल्याने ही सेवा बंद पडली. मात्र, उर्वरित सेवांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासेवेमुळे औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रासदेखील फायदा होत आहे. ओझर विमानतळावर विमानांचे नाईट पार्किंग, इंधन भरण्याची सोय असतानाही केवळ नाईट लॅण्डिंगची परवानगी नसल्याने रात्रीच्या सेवा देण्यात अडचणी येत होत्या. ओझर विमानतळ ‘एचएएल’च्या अंतर्गत येत असल्याने येथून नाईट लँण्डिंगसाठी ‘डीजीसीए’ची मंजुरी असणे आवश्यक होते. पंधरा दिवसांपूर्वी विमानतळावरून नाईट लॅँडिंगला परवानगी मिळाली असल्याने आता या विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. हैदराबाद-नाशिक-गोवा आणि याच परतीच्या मार्गाने ही सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे गोव्याबरोबरच हैदराबादशी नाशिकची हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

- Advertisement -

पर्यटनासाठी गोव्याकडे नाशिकरांचा सर्वाधिक ओढा असून रेल्वे किंवा मुंबईपर्यंत रस्ते आणि तेथून हवाई मार्गाने गोव्याकडे जावे लागते. ही सेवा सुरू झाल्याने नाशिकहून थेट गोव्याला पोहोचता येणार असल्याने वेळेत मोठी बचत होणार आहे. त्यामुळे या सेवेस नाशिककरांचा मोठा प्रतिसाद मिळू शकतो.

नाशिकची हवाई कनेक्टिव्हीटी वाढली

विमानसेवेमुळे नाशिकची हवाई कनेक्टीव्हिटी वाढली आहे. नाशिक विमानतळावरून नाईट लॅडिंगला परवानगी मिळाल्याने ऑक्टोंबरपासून त्यात आणखी भर पडणार आहे. यात गोव्याचा समावेश होणार आहे. त्यामुळे पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्राला निश्चितच चालना मिळेल. – खासदार हेमंत गोडसे.

संभाव्य वेळापत्रक

सायंकाळी ७ वाजता पणजीवरून विमानाचे उडडाण होईल. साडेआठला ओझर विमानतळावर लँण्डिंग होईल. तसेच रात्री ९ ला ओझर विमानतळाहून उडडाण हाईल. रात्री १०: वाजता पणजी विमानतळावर उतरेल, असे सांगितले जात आहे. यात बदल होण्याचीही शक्यता कंपनी सूत्रांनी वर्तवली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -