घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक महापौरपद निवडणूक : भाजपकडून ३ तर शिवसेनेकडून ४ अर्ज

नाशिक महापौरपद निवडणूक : भाजपकडून ३ तर शिवसेनेकडून ४ अर्ज

Subscribe

नाशिक महानगर पालिकेच्या महापौर पदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होणार आहे. त्यासाठी भाजपने ३ तर शिवसेनेच्या ४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

नाशिकच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत पक्षश्रेष्ठींना एका नावावर शिक्कामोर्तब करता आले नाही. त्यामुळे अखेर माजी सभागृह नेता शशिकांत जाधव, ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी आणि दिनकर आढाव यांना महापौरपदाचे अर्ज दाखल करण्याचे आदेश पक्षाने दिले. या तिघांपैकी दोघे २२ नोव्हेंबरला सभागृहात माघार घेतील. दुसरीकडे शिवसेनेने विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते, गटनेता विलास शिंदे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, माजी सभागृह नेत्या सत्यभामा गाडेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ज्यांना उमेदवारी नाकारली गेली, त्या नाराजांची समजूत काढण्यात पक्षश्रेष्ठींची दमछाक होत आहे.

२२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे. भाजपकडे पुरेसे संख्याबळ असले तरीही या पक्षातील नगरसेवक फोडण्यासाठी शिवसेना जीवाचे रान करत आहे. भाजपच्या सहलीस प्रारंभी १७ नगरसेवकांनी दांडी मारली. यापैकी नऊ नगरसेवकांनी प्रकृती आणि खासगी महत्वाच्या कामांमुळे सहभागी होता येत नसल्याचे सांगितले. उर्वरित नगरसेवकही आता भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले. पक्षाच्या सर्वच सदस्यांना व्हीप बजावण्यात आला आहे. एकीकडे मतदार नगरसेवकांची जमवाजमव सुरु असताना दुसरीकडे उमेदवारीसाठी अनेक दिग्गजांनी मोर्चा बांधणी सुरु केली. त्यात प्रामुख्याने जाधव व कुलकर्णी यांच्यासह दिनकर पाटील, हिमगौर आहेर-आडके, शिवाजी गांगुर्डे, दिनकर आढाव आणि गणेश गीते या सात इच्छुकांनी आघाडी घेतली होती. गिरीश महाजन यांनी गोव्याला नगरसेवकांची बैठक घेत प्रत्येक नगरसेवकाकडून महापौर कोण असावा याविषयीची चाचपणी केली. त्यातून चौघा नगरसेवकांची नावे यांचे निश्चित झाल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

भाजपप्रमाणेच शिवसेनेचीही खेळी

दुसरीकडे शिवसेनेने अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, सत्यभामा गाडेकर यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपच्या नगरसेवकांना आपल्या कंपूत आणून त्यांचे मतदान आपल्या बाजूने करुन घेण्याची अवघड जबाबदारी आता या चौघांच्या खांद्यावर आहे. भाजपने दुपारपर्यंत पत्ते खुले न केल्याने शिवसेनेने सध्या चौघांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत.


हेही वाचा – नाशिक मनपा: भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी, शिवसेनेत दोघांमध्येच स्पर्धा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -