घरमहाराष्ट्रनाशिकयुती सरकारला गाडून टाका - छगन भुजबळ

युती सरकारला गाडून टाका – छगन भुजबळ

Subscribe

शासनाकडे बारदान खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने तांदूळ खरेदी बंद असल्याचे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे केले आहे.

“आदिवासी बांधवांचे मुख्य पीक तांदूळ आहे मात्र शासनाकडे बारदान खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने तांदूळ खरेदी बंद आहे. त्यामुळे आदिवासी बांधव अडचणीत सापडला आहे. सरकारला एवढी भीक लागली आहे का? हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या सरकारला तांदूळसाठी बारदान खरेदी करता येत नाही ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे शेतकरी हित न जोपासणाऱ्या सरकारला खड्यात गाडून टाका पाडून टाका”, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादीकडून आयोजित निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेनिमित्त दिंडोरी येथे सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले भुजबळ

भुजबळ म्हणाले की, “शेतकऱ्याचा कांदा चाळीत सडत असून कांद्याला कोंब फुटले आहे. कांद्याला भाव मिळत नाही. वर्षाला ६६ हजार कोटी रुपये पिक विमा भरला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात सरासरी १७३ कोटी रुपये भरले जातात आणि विमा कंपन्यांकडून साधारणतः ३० कोटींची मदत मिळते. त्यामुळे पिकविम्यात ५५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा होतो आहे. अभ्यासक पी साईनाथ यांनी सद्या देशात राफेलहून अधिक मोठा घोटाळा पीकविमा योजनेत सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.” हे सरकार शेतकऱ्याच्या मुळावर उठले असून केवळ शेठजीना पैसे मिळवून देण्यासाठी सरकार पुढे आहे अशी टीका त्यांनी केली.

- Advertisement -

बंद पाडलेली कामे पुन्हा सुरु करण्याला भाग पाडू

सरकारने आघाडी सरकार गेल्यानंतर मांजरपाड्याचे काम बंद पाडले होते. त्यावेळी सातत्याने पाठपुरावा करून हे काम सुरू केले. पैसे कमी पडत आहे त्यामुळे या सरकारने पाच वळण बंधाऱ्यांचे कामे बंद केलेले आहे. ही कामे पुन्हा सुरू करण्यासाठी भाग पाडू. नार पारचे एक थेंबही पाणी गुजरातला जावू देणार नाही असे त्यांनी खडसावून सांगितले. महाराष्ट्राच्या पाण्याचा हक्क सोडला तर भविष्यात पाण्यासाठी कितीही पैसे खर्च केले तरी पैसे पाणी मिळणार नाही.एकीकडे सरकार जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च करते आणि सरकारला वळण बंधारे तयार करण्यासाठी पैसे नाही अशी टीका त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -