घरमहाराष्ट्रनाशिकराष्ट्रवादीचे कोडे उलगडले; नाशिकसाठी समीर भुजबळांना उमेदवारी

राष्ट्रवादीचे कोडे उलगडले; नाशिकसाठी समीर भुजबळांना उमेदवारी

Subscribe

नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ काका पुतण्यांपैकी कोण मतदारसंघात उतरणार याचे कोडे अखेर उलगडले असून, नाशिकमधून राष्ट्रवादीने माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ काका पुतण्यांपैकी कोण मतदारसंघात उतरणार याचे कोडे अखेर उलगडले असून, नाशिकमधून राष्ट्रवादीने माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नाशिक मतदारसंघाचा इतिहास बदलण्याची संधी समीर भुजबळ यांना प्राप्त झाली आहे. सेनेकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नसला तरी, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित समजून प्रचार सुरू केला आहे. गोडसे यांना उमेदवारी दिल्यास सलग तिसऱ्यांदा त्यांचा सामना भुजबळांशी होणार आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी भुजबळ कुटुंबियांमध्ये दिली जाणार असल्याचे निश्चित मानले जात होते. मात्र, छगन भुजबळ की समीर याचे कोडे अद्याप उलगडलेले नव्हते. गतपंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पावणे दोन लाख मतांनी पराभव केला. अर्थात त्यावेळी असलेली मोदी लाट, आणि निवडणुकीला दिला गेलेला जातीय रंग यामुळे भुजबळांचा पराभव झाल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहे. मात्र आता पाच वर्षात राजकीय परिस्थितीही बदलली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ काका-पुतणे सुमारे अडीच वर्षे तुरुंगात होते. त्यांची जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर छगन भुजबळ आक्रमकपणे राजकारणात सक्रीय झालेले पाहता लोकसभेचे उमेदवार तेच असतील अशी अटकळ बांधण्यात येत आहे, परंतु समीर भुजबळ यांनी गेल्या दोन महिन्यांपासून पक्षाची व विशेष करून नाशिक लोकसभा मतदारसंघाची सारी सूत्रे हाती घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -