घरमहाराष्ट्रनाशिकशरद पवार म्हणतायत, 'मी काय म्हातारा झालो काय?'

शरद पवार म्हणतायत, ‘मी काय म्हातारा झालो काय?’

Subscribe

शरद पवारांनी निफाड येथे झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या शेतकरी विषयक धोरणांवर कडाडून टीका केली.

माढ्यामधून उमेदवारी माघारी घेतल्यानंतर भाजपकडून, विशेषत: पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांवर वारंवार टीका केली जात आहे. ‘पवारांनी हवा ओळखली आणि पळ काढला’, अशा शब्दांत भाजपच्या प्रत्येक सभेतून पवारांवर निशाणा साधला जात असतानाच, आता पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे. निफाडमध्ये बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारसभेत ‘या वयात फिरतो म्हणजे मी काय म्हातारा झालो का? काही काळजी करू नका. मी भक्कम आहे. मोदींना घालवल्याशिवाय मी स्वस्थ बसायचो नाही’, असं पवार या सभेमध्ये बोलले. त्यामुळे त्यांनी असं बोलून थेट मोदींवरच निशाणा साधल्याचं बोललं जात आहे.


हे तुम्ही वाचलंत का? – मुख्यमंत्री – शरद पवारांमध्ये चड्ड्यांवरून झाली टीका-टिप्पणी!

‘हा गडी काही आपला नाही!’

दरम्यान, यावेळी पवारांनी नोटबंदीवर देखील टीका केली. ‘मोठया लोकांकडे काळा पैसा आहे. शेतकऱ्यांकडे कुठचा काळा पैसा? श्रीमंतांच्या काळ्या पैशाला हात लावला नाही. शेतकऱ्यांचा व्यवसाय चलनबंदीच्या माध्यमातून संकटात आणला आणि शेतकऱ्यांना संकटात आणण्याचे पाप भाजप सरकारने केले’, असं पवार म्हणाले. ‘व्यापारी बांधव सुरुवातीला मोदी नावाचा गजर करत होते आणि आता मोदींना काढून टाकण्याचा विचार करत आहेत. नशीब कळंल बिचार्‍यांना की हा गडी आपला नाही. हा कुणाचाच नाही’, असंही शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

वातावरण सरकार विरोधी, पण ईव्हीएम घोटाळ्याची भीती – शरद पवार

‘सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था नाही’

यावेळी शरद पवारांनी भाजपच्या शेतकरी विषयत धोरणावर देखील टीका केली. भाजप सरकार शेतकरी विरोधी कसे आहे आणि त्यांचे निर्णय कसे शेतकरी विरोधी आहेत याची मांडणी त्यांनी आपल्या भाषणात केली. ‘आम्ही शेतीबाबत निर्णय घेतल्यामुळे देशातील शेती उत्पादन वाढले होते. परंतु आज नवीन कारखानदारी आली नाही. शेती संकटात म्हणजे देशाची आर्थिक स्थिती संकटात येते. शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढली तर अर्थव्यवस्थेला मदत होते. शेतकऱ्यांची खरेदी करण्याची ताकद नसेल तर उद्योग, कारखाने संकटात येतात. तेच चित्र आज पहायला मिळत आहे. कारण या सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था नाही’, असा आरोप शरद पवारांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -