घरमहाराष्ट्रनाशिकधारणकरांवरील कारवाई रद्द होण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार

धारणकरांवरील कारवाई रद्द होण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार

Subscribe

आयुक्तांना दिले निवेदन; न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणेच गुन्हा दाखल केल्याचा दावा)

अनधिकृत होर्डिंग लावणार्‍यांवर कारवाई केल्याप्रकरणी पूर्व विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांच्यावर महापौरांनी केलेली निलंबनाची कारवाई ही अनुचीत असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे यांच्यासह शिष्टमंडळाने म्हटले आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सादर करीत धारणकरांवरील कारवाई मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महापौरांचा हा निणॅय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लंघन करणारा आहे. अनधिकृत होर्डिंग्ज लावणार्‍यांविरुध्द होर्डिंग उभारण्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश खुद्द उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. पोलिसांनी देखील पुराव्यांचा विचार करुन गुन्हा दाखल करुन घेतला होता. परंतु सभागृहात थेट निलंबनाची कारवाई केल्याने आम्ही किंवा संबंधित न्यायालयात गेल्यास महासभेवर कारवाई होऊ शकते याचे भान महापौरांना नसावे. धारणकर हे कार्यक्षम आणि तत्पर अधिकारी असून आपले काम चोख व प्रामाणीकपणे करत आलेले आहेत. त्यांनी अनधिकृत होर्डिंग विरुध्द केलेली कारवाई ही कायदेशीर आहे. या अधिकार्‍याच्या आपण आयुक्त म्हणून पूर्ण ताकदीनिशी खंबीरपणे पाठीशी उभे रहावे व महापौरांनी बेकायदेशीर सुनावलेली शिक्षा स्थगित करुन रवींद्र धारणकर यांच्यावर कुठलीही कारवाई करु नये, अशीही मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

आयुक्तांना निवेदन देताना नंदन भास्करे यांच्यासह श्रेयांस सराफ, आकाश कदम, चेतन व्यवहारे, श्लोक भागवत, अक्षय दाते, भावनेश राऊत, ललीत मानकर, गौरव सोनार आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -