देवळ्याजवळ 108 रुग्णवाहिका पलटी ; चालक किरकोळ जखमी

चालक जखमी; जीवितहानी नाही

deola- ambulance accident
देवळा - कळवण रोडवर मटाने गावाजवळ पलटी झालेली 108 रुग्णवाहिका. (छाया : जगदिश निकम )

देवळा – कळवण रस्त्यावर बुधवारी (दि. १५) सायंकाळच्या सुमारास मटाणे गावाजवळ १०८ रुग्णवाहिका पलटी झाली . ही रुग्णवाहिका रिकामी असल्याने पुढील अनर्थ टळला असून, चालक किरकोळ जखमी झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की , मंगळवारी (दि. १५) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कळवण कडून देवळयाच्या दिशेने येत असताना मटाणे ता. देवळा येथे १०८ रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात रुग्णवाहिका चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही रुग्णवाहिका कोरोना रुग्णाला कोविड सेंटरला दाखल करून परत येत असतानाच हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समजली असून अपघाताचे कारण समजू शकले नाही. मात्र या अपघातात रुग्णवाहिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ती रिकामी असल्याने पुढील अनर्थ टळला आहे. देवळा पोलिसांनी मोटर अपघाताची तक्रार दाखल करून घेतली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.