घरताज्या घडामोडीचिंताजनक! नाशिक जिल्ह्यात १२ कोरोनाबाधित रुग्ण; वाचा कुठे किती रुग्ण वाढले

चिंताजनक! नाशिक जिल्ह्यात १२ कोरोनाबाधित रुग्ण; वाचा कुठे किती रुग्ण वाढले

Subscribe

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात 12 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मालेगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9 झाली आहे. मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेले संशयित कोरोना रुग्णांचे गुरुवारी (दि.9) रात्री रिपोर्ट जिल्हा रुग्णालयास मिळाले आहेत. त्यामध्ये 5 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 4 जण मालेगाव व एकजण चांदवड येथील आहे.

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी खबरदारी घेत आहेत. मार्च महिन्यात नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून न आल्याने प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला होता. मात्र, मालेगाव शहरात बुधवारी व गुरुवारी सलग दोन  दिवसांत 10 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव शहर संपूर्ण सील करण्यात आले आहे.

- Advertisement -

मालेगाव, निफाड, चांदवड तालुक्यांमध्ये व नाशिक शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहेत. गुरुवारी पाठविण्यात आलेल्या 40 नमुन्यांपैकी रात्री उशिरा 5 नमुन्यांचे रिपोर्ट पुणे राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडून जिल्हा रुग्णालयास मिळाले. ते 5 रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत.  चारजण 35 ते 40 वयोगटातील असून एकजण वयोवृद्ध आहे. मालेगावमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

- Advertisement -

 

नातेवाईक, संपर्कातील नागरिकांचा शोध सुरू

मालेगाव शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9 झाली आहे. मालेगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णांच्या नातेवाईक व संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेवून त्यांच्या त्यांच्या तपासण्या केल्या जात आहेत, असे कोरोना जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले. 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -