घरCORONA UPDATEमालेगाव महापालिका आयुक्त बोर्डे यांची उचलबांगडी

मालेगाव महापालिका आयुक्त बोर्डे यांची उचलबांगडी

Subscribe

करोना प्रकरणातील निष्काळजीपणा भोवला, कासार नवे आयुक्त

करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात केलेला निष्काळजीपणाचा ठपका ठेवत राज्य सरकारने मालेगाव महापालिका आयुक्त किशोर बोर्डे यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागेवर अमरावती येथील जिल्हा प्रशासन अधिकारी त्र्यंबक कासार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मालेगावात करोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यातच महापालिका आयुक्त बोर्डे यांचा निष्काळजीपणा दिसून आला होता. मोबाईल बंद ठेवणे, कार्यवाही करण्यात विलंब अशा त्यांच्या वागण्याच्या तक्रारी थेट राज्य सरकारपर्यंत पोहोचल्या होत्या. विशेष म्हणजे बोर्डे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असा अहवालदेखील स्थानिक प्रशासनाकडून राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला सादर करण्यात आला होता. शासनाने वैद्यकीय कारण दाखवत बोर्डे यांची बदली केली असली तरीही सध्याची स्फोटक परिस्थिती पाहता या बदलीमागे त्यांचा हलगर्जीपणाच असल्याचेही सांगितले जाते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -