घरमहाराष्ट्रनाशिक‘एनएमसी ई-कनेक्ट’ गुगल प्ले स्टोअरवर पुन्हा ‘अवतरणार’

‘एनएमसी ई-कनेक्ट’ गुगल प्ले स्टोअरवर पुन्हा ‘अवतरणार’

Subscribe

काही परवानग्यांच्या पूर्ततेसाठी गुगलने तात्पुरत्या स्वरुपात अ‍ॅप काढून टाकल्याचे महापालिकेचे स्पष्टीकरण

महापालिकेचे इ कनेक्ट अ‍ॅप्लीकेशन हे काही परवानग्यांच्या पूर्ततेसाठी गुगल प्ले स्टोअरवरुन तात्पुरत्या स्वरुपात काढण्यात आले; मात्र ते लवकरच गुगल प्लेवर दाखल होईल असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले आहे. ज्यांच्याकडे यापूर्वी हे अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड आहे, त्यांना तक्रार दाखल करताना कोणतीही अडचण येणार नाही. नवीन वापरकर्त्यांना महापालिकेशी संबंधित तक्रार करायची असल्यास त्यांनी www.nmc.gov.in किंवा ७०३० ३००३०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन भारत आणि डिजिटल इंडियाचा पुरस्कार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेचा भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर अवघ्या काही वेळातच भाजपाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेचे एनएमसी-इ-कनेक्ट’ अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन गायब झाले. त्यामुळे पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाला हरताळ फासल्याची चर्चा सर्वदूर पसरलीे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्पष्टीकरणाचे सविस्तर पत्रक प्रसिध्द केले आहे. त्यात म्हटले आहे की, गुगलने आपल्या विकास धोरणात सुधारणा केली आहे. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेच्या एनएमसी इ- कनेक्ट अ‍ॅपमधील काही परवानग्यांबाबत पूुर्तता करण्यासाठी हे अ‍ॅप हे गुगल प्ले स्टोअरवरुन तात्पुरत्या स्वरुपात काढले आहे. गुगलने नमुद केलेल्या मुद्दयांची पुर्तता महापालिकेने केलेली आहे. तिची तपासणी करुन लवकरच हे अ‍ॅप्लीकेशन गुगल प्ले स्टोअरवर टाकले जाईल. यापुर्वी ज्या नागरिकांनी एन.एम.सी. ई- कनेक्ट डाऊनलोड केले असेल, त्यांना ते पून्हा डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही. या अ‍ॅपमध्ये समाविष्ट असलेले फिचर्स तसेच राहतील. यात तक्रार निवारण, प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक व माहिती, महापालिकेच्या कामाकाजाशी संबंधित मुलभुत बाबींची माहिती, पोलिस, हॉस्पीटल्स, अ‍ॅम्बुलन्स, रक्तपेढया व इतर महत्वाचे दूरध्वनी क्रमांक, घरपट्टी व पाणीपट्टी कर भरण्याची सुविधा, जन्म दाखले व मृत्यु दाखल्यांबाबतची माहिती, फेसबुक पेज, ट्वीटर हँडल, युटयुब तसेच घंटागाडी व पेस्ट कंट्रोलचे जीपीएस ट्रॅकिंग आदी कामांचा यात समावेश असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -