घरमहाराष्ट्रनाशिकखर्चात तफावत; उमेदवारांना नोटीसा

खर्चात तफावत; उमेदवारांना नोटीसा

Subscribe

डॉ. भारती पवार, धनराज महाले, जे. पी. गावित यांचा समावेश

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा ताळमेळ जिल्हा निवडणूक विभागाने घेतला असता मोठी तफावत आढळली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार, राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले, माकपचे उमेदवार जे.पी. गावित यांच्या खर्चात लाखो रुपयांची तफावत आढळली आहे. त्यामुळे निवडणूक विभागाकडून या उमेदवारांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक विभागाकडून उमेदवारांचा नोंदवलेला खर्च व उमेदवारांच्यावतीने सादर केलेला खर्च याचा ताळमेळ बसतो का, हे पाहण्यासाठी निरीक्षकांचे पथक तपासणी करते. निरीक्षकांसमोर उमेदवारांच्या खर्चाची तिसरी तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी खर्चाचा तपशील जाहीर केला आहे. निवडणूक विभागाने डॉ. भारती पवार यांचा खर्च १४ लाख ६७ हजार ६४ निश्चित केला आहे. पण त्यांनी ३ लाख ९१ हजार २८९ सादर केला असून १० लाख ७५ हजार ७७५ रुपयांची तफावत आढळली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले यांचा खर्च १४ लाख २० हजार ९४९ रुपये आयोगाने निश्चित केला आहे. त्यांनी प्रत्यक्षात २ लाख ८८ हजार ७४५ रुपये खर्च सादर केला असून ११ लाख ३२ हजार २०४ रुपयांची तफावत आढळून आली आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे माकपचे उमेदवार जिवा पांडू गावित यांचा खर्च ११ लाख ३५ हजार २११ रुपये असून त्यांनी निवडणूक शाखेकडे ९ लाख ९८ हजार ९५२ रूपये खर्च सादर केला असून १ लाख ३६ हजार २५९ रुपयांची तफावत आढळून आली आहे. या प्रमुख उमेदवारांसह अपक्ष अ‍ॅड. टी.के.बागूल यांनी ४ लाख १८ हजार ७३५रूपयांचा खर्च निश्चित केला असून त्यांच्या खर्चात १ लाख ३२ हजार ३६० रुपये तफावत दिसून आली आहे. निवडणूक शाखेच्या तपासणीनंतर त्यांनी २ लाख ८६ हजार ३७५ रुपये खर्च सादर केला आहे. बसपाचे उमेदवार अशोक जाधव यांचा खर्च १ लाख ६७ हजार ५६१ इतका निश्चित केला असून प्रत्यक्षात त्यांनी ५३ हजार ५६१ रुपये खर्च सादर केला आहे. त्यांच्या खर्चात १ लाख १४ हजारांची तफावत दिसून आली आहे. या उमेदवारांना निवडणूक शाखेकडून नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातचे निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -