सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या समवेत आमदार बाळासाहेब सानप यांनी केली पाहणी

Nashik

लाडक्या गणरायाचे अनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे शहरात वाकडी बारव येथून पारंपरिक मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणूक मार्गावर कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी वाहतूक मार्ग पाहणी, विद्युुत तारा, मंडळ पदाधिकार्‍यांच्या सूचनांचा विचार पोलिसांकडून करण्यात आला. मंगळवारी पोलीस आयुक्त, मनपा, विद्युुत वितरण, अग्निशामक, राजकीय पदाधिकारी यांसह मंडळ पदाधिकार्‍यांच्या उपस्थित भद्रकाली परिसरातून पाहणी दौरा करण्यात आला.

यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, आमदार बाळासाहेब सानप, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त अशोक नखाते, सहायक आयुक्त-२ प्रदीप जाधव, सहायक आयुक्त अनिरुद्ध आढाव, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे, सरकारवाडाचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी, पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. डी. पाटील, वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत आदी अधिकार्‍यांसह गणपती महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, महापालिकेचे सभागृहनेते सतीश सोनवणे, सुनील बागूल उपस्थित होते. यानंतर आयुक्त नांगरे-पाटील यांनी अधिकारी, कर्मचार्‍यांसमवेत रामकुंड, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण, खंडेराव महाराज पटांगण, कपुरथळा पटांगण, रोकडोबा मंदिर परिसर आदी ठिकाणी पहाणी करून संबंधित अधिकार्‍यांना सूचना केल्या.

गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांसह पालिका प्रशासनाने नियोजनाची दिशा ठरवली.


हे देखील वाचा – महंत सुधीरदास यांची दुबईतून सुटका


प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here