घरमहाराष्ट्रनाशिकअतिरिक्त CEO विरुद्ब गुन्हा

अतिरिक्त CEO विरुद्ब गुन्हा

Subscribe

कोरोना परिस्थिती हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याने जिल्हा प्रशासनाकडून कारवाई

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात हलगर्जीपणा आणि चुकीची आकडेवारी देत दिशाभूल करणं जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांना चांगलंच महागात पडलं. जिल्हा प्रशासनानं शिंदे यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हादेखील दाखल झालाय.

क्लास वन अधिकार्‍याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातली पहिलीच घटना आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी शिंदे यांच्यावर नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, जबाबदारी पार पाडण्यात दुर्लक्ष झाल्याने त्यांना कारवाईला सामोरं जावं लागलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -