बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध जखमी

जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी येथे रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास बिबट्याने ७५ वर्षीय वृद्धावर हल्ला केला. या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाला आहे. कान्हू चिमा धुपारे (७५) असे जखमीचे झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

कान्हू धुपारे घरात झोपले होते. पहाटे ४ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरात बिबट्या घरात घुसला. बिबट्याने झोपेत असलेल्या धुपारे यांच्यावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. ही बाब ग्रामस्थांना समजताच त्यांना उपचारार्थ घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.