घरमहाराष्ट्रनाशिक‘वन सिटी वन कार्ड’ योजना शहरात लागू होणार

‘वन सिटी वन कार्ड’ योजना शहरात लागू होणार

Subscribe

कार्डच्या माध्यमातून महापालिकेचे विविध कर, पार्किग शुल्क, बसचे भाडे यांसह व्यावसायिक दालनांमध्येही खरेदी करता येणार

‘वन नेशन वन कार्ड’च्या धर्तीवर स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ‘वन सिटी वन कार्ड’ ही योजना नाशकात लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात क्रेडीट वा डेबीट कार्डप्रमाणे नागरिकांना स्मार्ट कार्ड दिले जाईल. या कार्डच्या माध्यमातून महापालिकेचे विविध कर, पार्किग शुल्क, बसचे भाडे यांसह व्यावसायिक दालनांमध्येही खरेदी करता येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन नेशन वन कार्ड सेवेचा नुकताच शुभारंभ केला. या कार्डचा वापर जनतेला सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक सेवेच्या तिकिटाचे पैसे देण्यासाठी तसेच अन्य सेवांसाठीही हे कार्ड उपयोगात आणता येईल. रुपेद्वारे देण्यात येणार्‍या या कार्डचा नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणूनही वापरता येणार आहे. त्याच धर्तीवर स्मार्ट शहरांसाठी ‘वन नेशन वन कार्ड’ ची योजना राबवण्यात येणार आहे. यात स्मार्ट पार्किंगचे शुल्क, महापालिकेच्या वतीने चालवण्यात येणार्‍या बसेस, सायकल शेअरिंग यांसारख्या योजनांसाठी हे कार्ड वापरता येणार आहे. यासंदर्भातील माहिती स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थवील यांनी दिली.

- Advertisement -

सायकल शेअरिंगसाठी ७० हजार नागरिकांची नोंदणी

सायकल शेअरिंग उपक्रमांतर्गत आजवर ७० हजार ९६ नागरिकांनी स्मार्ट सिटी कंपनीकडे नोंदणी केली आहे. सायकल शेअरिंग देशाच्या विविध शहरांत राबवण्यात आला असला तरीही तो केवळ नाशिक शहरातच यशस्वी झाल्याचा दावा प्रकाश थवील यांनी केला. शहरात आजवर १ लाख २२ हजार वेळा सायकल्स चालवण्यात आल्या आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर ही सायकल ३० किलोमीटर चालते. बॅटरी सुमारे ३ वर्षांपर्यंत टिकते. पावसामुळे डॉकींग स्टेशनची दुरावस्था झाली आहे की काय याची तपासणी करण्यात येत असल्याचे थवील म्हणाले.

सौर उर्जेमुळे १ कोटींची बचत

महापालिकेच्या सर्वच इमारतींवर सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिकेची सुमारे १ कोटी रुपयांची तसेच १ मेगावॅट विजेची बचत होणार आहे. महापालिकेच्या १५ इमारतींवर हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

- Advertisement -

स्मार्ट सिटीसाठी ४३५ कोटींचा निधी प्राप्त

नाशिक शहरात केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुमारे २१९४.६४ कोटींची कामे केली जाणार आहेत. यातील ४३५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच ३१.६० कोटींच्या निधीचा वापर विविध कामांसाठी करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -