घरमहाराष्ट्रनाशिकक्षणात पेटली दुचाकी अन चालकाचा घेतला बळी

क्षणात पेटली दुचाकी अन चालकाचा घेतला बळी

Subscribe

दुचाकी टाकी लिक होत सायलन्सवर पडले पेट्रोल

दुचाकीची टाकी लिक झाल्याने पेट्रोल सायलन्सरवर पडले. त्यात दुचाकीचा भडका झाल्याने दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान दुचाकीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.१९) रात्री धृवनगर भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. निरंजन घनश्याम सरोदे (५५ रा.धृवनगर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे.

निरंजन सरोदे शुक्रवारी (ता.१९) सातपुर येथे गेले होते. रात्री 9.30 वाजेच्या सुमारास ते घराकडे येत असताना ही घटना घडली. घराजवळ पेट्रोलचा वास आल्याने त्यांनी दुचाकी थांबवून पेट्रोल टाकी हलवून पाहिली. तेंव्हा पेट्रोलची टाकी लिक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दुचाकी हलविल्याने टाकीतील पेट्रोल सायलेन्सरवर पडले आणि त्यात दुचाकीचा भडका झाला. या घटनेत सरोदे गंभीर भाजले. त्यांना उपचारासाठी पत्नी जोत्सना सरोदे यांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. शनिवारी (ता.२०) उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -