Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक भरवस फाट्यावर दरोडा; वृद्ध ठार, पत्नी गंभीर

भरवस फाट्यावर दरोडा; वृद्ध ठार, पत्नी गंभीर

नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील निफाड तालुक्यातील घटना

Related Story

- Advertisement -

लासलगाव : नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे घरफोडी दरम्यान एक वृद्ध ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने परिसरात दहशत पसरली आहे. कारभारी आबाजी जगताप असे मृताचे नाव आहे.

लासलगाव पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, भरवस फाटा येथे नाशिक-औरंगाबाद रस्त्यालगत कारभारी आबाजी जगताप (६९) व अलका कारभारी जगताप हे दाम्पत्य राहते. त्यांची मुले वस्तीवर वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. ते सकाळी वडिलांच्या घरी गेले असता कारभारी जगताप मृतावस्थेत तर त्यांची पत्नी अलका गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्याने या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल होताच जखमी महिलेला पुढील उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या जबाबानंतर या घटनेचा उलगडा होणार असला, मात्र परिस्थितीनुसार पोलीस घरफोडी की खून या दिशेने तपास करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधीक्षक सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक रंगनाथ सानप, सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांसह पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.

- Advertisement -