घरताज्या घडामोडीगिरणा नदीत बुडून युवकाचा मृत्यू

गिरणा नदीत बुडून युवकाचा मृत्यू

Subscribe

लोहोणेर (ता.देवळा) येथील एका युवकाचा शनिवारी (दि.२५) रोजी दुपारी गिरणा नदीत बुडून मृत्यू झाला.  कल्पेश भगवंतराव देशमुख (वय १९) असे मृताचे नाव आहे. अक्षयतृतीया सणाच्या पूर्वदिनी ही घटना घडल्याने येथे हळहळ व्यक्त होत आहे.

लोहोणेर येथील पाच-सहा मुले शनिवारी पारी तीन वाजेच्या दरम्यान वसाका साखर कारखान्याच्या बाजूला असलेल्या गिरणा नदीपात्रात पोहोण्यासाठी गेले होते. परंतु येथे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने कल्पेश पाण्यात बुडाला. ही बाब समजताच परिसरातील ग्रामस्थांनी धावाधाव करून कल्पेशला बाहेर काढले व उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, त्याचा तत्पूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कल्पेशने नुकतीच १२ वीची परीक्षा दिली असून त्याच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ असा परिवार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -