घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यात १५१ स्कुलबसची तपासणी

जिल्ह्यात १५१ स्कुलबसची तपासणी

Subscribe

ग्रामीण पोलीस आणि आरटीओने केली तपासणी; ४९ वाहनांकडून ६२०० दंड वसूल

जिल्हा ग्रामीण पोलीस व आरटीओच्या संयुक्त विद्यमाने पथकाने १७ ते २० जुलै दरम्यान गंगापूर, चाणशी, गिरणारे, त्र्यंबकेश्वर रोड, ओझर चांदवड मार्गावर १५१ स्कूलबसची तपासणी केली. तपासणीत १० स्कूलबसेसनी वाहतूक नियमांचा भंग केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांना त्या १० वाहनांना रोखून ठेवले. यावेळी ४९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. स्कूल बसचालकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात बोलवत त्यांच्याकडून ६ हजार २०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

स्कूल बस सुरक्षा समिती अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक व मालेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने १७ जुलै ते २० जुलै दरम्यान जिल्ह्यातील स्कूल बसची तपासणी करण्यात आली. वाहनचालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या. तपासणीत कागदपत्रांची तपासणी, स्कूलबसमध्ये चालकांव्यतिरिक्त परिचारक आहेत की नाहीत, याची खात्री करण्यात आली. यावेळी चालकांचे प्रबोधन करण्यात आले. चालकांनी स्वत:ची व परिचारकांची चरित्र्य पडताळणी करावी. वाहन व्यवस्थित ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -