घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये १ लाख शेतकरी किसान सन्मान योजनेपासून वंचित

नाशिकमध्ये १ लाख शेतकरी किसान सन्मान योजनेपासून वंचित

Subscribe

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी नाशिक जिल्ह्यातून सुमारे ४ लाख शेतकर्‍यांची माहीती ऑनलाईन अद्यावत करण्यात आली आहे. मात्र यापैकी तब्बल १ लाख शेतकर्‍यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करूनही नाशिक जिल्ह्यातील तब्बल एक लाख शेतकर्‍यांना अद्याप एकदाही या योजनेचे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे ही रक्कम कधी जमा होणार असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून विचारला जात आहे. पंतप्रधान किसान योजने अंतर्गत देशातील सर्व शेतकर्‍यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ज्या शेतकर्‍यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जागा आहे त्यांना याचा लाभ दिला जातो.


हेही वाचा – ओल्या दुष्काळासाठी शेतकरी एकवटला

- Advertisement -

तब्बल १ लाख शेतकर्‍यांना योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी नाशिक जिल्ह्यातून सुमारे ४ लाख शेतकर्‍यांची माहीती ऑनलाईन अद्यावत करण्यात आली आहे. मात्र यापैकी तब्बल १ लाख शेतकर्‍यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही. तर काहींना तीनही हप्ते प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे याबाबत विचारणा सुरू केली आहे. मात्र कुणाला पैसे मिळाले, कुणाला नाही याबाबत कोणतीही माहीती प्रशसनाला उपलब्ध करून दिली जात नसल्याने प्रशासनाकडूनही शेतकर्‍यांना समर्पक अशी उत्तरे मिळू शकत नाहीत. प्रशासनाकडून केवळ शेतकर्‍यांच्या माहीती अद्यावत केली जाते. ४ लाखापैकी ३५ हजार शेतकर्‍यांच्या माहीतीत त्रुटी आढळून आल्याने ही माहीती अद्यावत करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.


हेही वाचा – ‘मुख्यमंत्र्यांचं स्वागत शेतकरी जीव देऊन करतात; भाजपाच्या सत्तेत हे परिणाम भोगावे लागतात’

- Advertisement -

 

अनुजदान देण्यासाठी ६२ बॅच

हे अनुदान देण्यासाठी आतापर्यंत ६२ बॅच करण्यात आल्या आहेत. अनुदानाचा पहिला हप्ता देण्यासाठी नुकतीच ६२ व्या बॅचमधील ३६ हजार ५७२ शेतकर्‍यांची निवड करण्यात आली. तर राज्यात ४ लाख १६ हजार ५५८ शेतकर्‍यांना दुसरा तर २ लाख २४ हजार ४०९ शेतकर्‍यांना तिसरा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. राज्यातून इतक्या कमी प्रमाणात शेतकर्‍यांना अनुदान प्राप्त होत असल्याने यात नाशिक जिल्हयातील शेतकर्‍यांची संख्या अगदी १०० च्या आसपास असल्याचे समजते. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -