रूंग्टा ग्रुपच्या इमारतीवरून पडून मजूर ठार

आनंदवली येथील बांधकाम साईटवर इमारतीचे काम सुरू, तिसर्‍या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू

Nashik
Death
प्रातिनिधिक छायाचित्र

रुंग्टा ग्रुपच्या आनंदवली येथील बांधकाम साईटवर इमारतीचे काम सुरू होते. यावेळी तिसर्‍या मजल्यावर काम करत असलेल्या बबलू बलराम मंडळ (३२, मूळ रा. पश्चिम बंगाल) याचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, आनंदवली येथे रूंग्टा ग्रुपच्या बांधकाम साईटवर काम सुरू असताना शनिवारी (ता.१३) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास बबलू मंडळ हा कामगार तोल जाऊन उंचावरून पडला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, शहरात बांधकाम व्यावसायिकांकडील मजूर, कामगारांना होणार्‍या अपघातांच्या घटना वाढत असल्याचे सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.