घरमहाराष्ट्रनाशिककांदा कोसळला, २ दिवसांत १०५१ रुपयांची घसरण

कांदा कोसळला, २ दिवसांत १०५१ रुपयांची घसरण

Subscribe

शेतकर्‍यांना दोन दिवसांत तब्बल १०५१ रुपये प्रति क्विंटलचा फटका

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ऐन सणासुदीच्या तोंडावर कांदा बाजार भाव दोन दिवसांत तब्बल १०५१ रुपयांनी घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. सोमवारी सरासरी ४६५१ रुपये प्रतिक्विंटलने विक्री झालेला कांदा बुधवारी (दि.११) सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाला. शेतकर्‍यांना दोन दिवसांत तब्बल १०५१ रुपये प्रति क्विंटलचा फटका बसला आहे.

गुरुवार, १२ नोव्हेंबरपासून लासलगाव बाजार समितीला दीपावलीनिमित्त आठ दिवस सुट्या असल्याने बाजार समितीत कांदा आवक वाढलेली आहे.१२ सप्टेंबरनंतर प्रथमच येथील मुख्य बाजार आवारावर मंगळवारी बारा हजार क्विंटलचा पुढे कांदा लिलावासाठी आला होता. परदेशी आयात केलेला कांदा, वाढती उन्हाळ कांदा तसेच नवीन लाल कांद्याची आवक यामुळे लासलगाव बाजार समितीत दोन दिवसांत १०५१ रुपयाने कांदा गडगडल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. सणासुदीच्या काळात कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने कुटुंब कसे चालवावे आणि झालेला खर्च कसा काढावा असा प्रश्न आता कांदा उत्पादकांसमोर उभा राहिला आहे. वेगवेगळ्या निर्बंधांमुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

- Advertisement -

सकाळच्या सत्रात येथील बाजार समिती ७८८ वाहनातून ८६५० क्विंटल कांद्याची आवक झाली होती,त्याला कमाल ४८९९ रुपये, सर्वसाधारण ३६०० रुपये तर किमान ९०० रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजार भाव जाहीर झाला तर लाल कांद्याला किमान १३५१, सरासरी ३१०० तर जास्तीत जास्त ३९०० रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -