घरमहाराष्ट्रनाशिकहेल्मेटचा दर्जा तपासणाऱ्या देशात केवळ दोन संस्था

हेल्मेटचा दर्जा तपासणाऱ्या देशात केवळ दोन संस्था

Subscribe

हरियाणा व दिल्लीतील दोन खासगी प्रयोगशाळा वगळता देशात हेल्मेटचा दर्जा तपासण्यासाठी सरकारी यंत्रणाच अस्तित्वात नसल्याची धक्कादायक स्थिती आहे.

पोलिसांनी केलेल्या हेल्मेट वापराच्या आवाहनाचे नाशिककरांनी स्वागत केले असून ८५ टक्के वाहनचालक हेल्मेट व सीटबेल्ट वापर असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, काही दिवसांपासून शहरात दर्जाहीन हेल्मेट विक्रीचे पेव फुटले आहे. केवळ पोलीस कारवाईतून सुटका व्हावी, यासाठी वाहनचालक स्वस्तातील हे हेल्मेट विकत घेत आहेत. प्रत्यक्षात सुरक्षिततेची हमी असलेले हे हेल्मेट नव्हे, तर जिवाशीच खेळ आहे, असे अनेकांचे मत आहे. हरियाणा व दिल्लीतील दोन खासगी प्रयोगशाळा वगळता देशात हेल्मेटचा दर्जा तपासण्यासाठी सरकारी यंत्रणाच अस्तित्वात नसल्याची धक्कादायक स्थिती आहे.

भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) आयएस ४१५१ मानकानुसार बनविलेले हेल्मेटला प्राधान्य दिले आहे. त्याप्रमाणे हेल्मेटची गुणवत्ता चाचणी होणे गरजेचे आहे. मात्र, ती करण्यासाठी सरकारची यंत्रणाच नाही. देशात पंचकुला (हरियाना) येथे इंटरस्टेलर टेस्टिंग सेंटर प्रा.लि. व नोएडा (दिल्ली) येथे टेस्टटेक्स इंडिया लॅबोरेटरीज प्रा.लि. या दोन खासगी कंपना हेल्मेट गुणवत्ता तपासणी करीत असल्याचे ‘बीआयएस’च्या संकेतस्थळावर दिले आहे. शहरात अनेक महिन्यांपासून रस्त्यांवर व ठिकठिकाणी हेल्मेट विक्रीची दुकान थाटण्यात आली आहेत. हे दुकान ३०० ते ६०० रूपयांपर्यंत दर्जाहीन हेल्मेट विकून नाशिककरांच्या जीवाशी खेळत आहेत. अशा पद्धतीने दर्जाहीन हेल्मेट बनवणारे उत्पादक अथवा विक्रेत्यांवर आजतागायत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.

- Advertisement -

दरम्यान, हेल्मेट दर्जाहीन असेल आणि त्यावर ‘आयएसआय’चा बनावट उल्लेख असेल, तर विक्रेत्यांविरूद्ध नागरिक पोलिसांत तक्रार करू शकतात. दुचाकी विक्रेते डिलर्स दुचाकीसोबत हेल्मेट देत नाहीत, असे निदर्शनास आले आहे. तसेच, हेल्मेट दिल्याची बोगस पावती जोडत आहेत. हेल्मेट न देणार्‍या डिलर्सवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -