घरताज्या घडामोडीअद्यावत डिजीटल पोलीस चौकीचे उदघाटन

अद्यावत डिजीटल पोलीस चौकीचे उदघाटन

Subscribe

कॉलेज रोडवर अत्याधुनिक सुविधायुक्त डिजिटल पोलीस चौकीचे उदघाटन गुरुवारी (दि.९) पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्मार्ट पोलीस संकल्पनेतून या पोलीस चौकीचे नुतनीकरण करण्यात आले. शहरातील अन्य ५२ पोलीस चौक्यांचे अशाच प्रकार नुतनीकरण करण्यात येणार आहे. पोलीस कामाचे विकेंद्रीकरण, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा चौकी उपयुक्त ठरणार आहेत, असे नांगरे-पाटील यांनी सांगितले.

गंगापूर पोलीस ठाणे हदीतील कॉलेज रोडवरील कॉलेज रोड पोलीस चौकीचे मिनी पोलीस ठाण्याच्या धर्तीवर या चौकीचे नुतनीकरण करण्यात आले. गुरुवारी (दि.) भोसला मिलीटरी स्कूलची विद्यार्थिनी पूर्वा जोशी हिच्या हस्ते चौकीचे फीत कापण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्तांसह मान्यवरांनी चौकीत प्रवेश करत पाहणी केली. त्यानंतर नांगरेपाटील यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी अशोक पंजाबी, रविश जाजू, मयुर शहाणे, ठेकेदार शशी हिरवे यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, आमदार सीमा हिरे, बी.वाय.के. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राम कुलकर्णी, शिवसेना गटनेते विलास शिंदे, नगरसेविका हिमगौरी आहेरआडके, स्वाती भामरे, रतन लत आदी उपस्थित होते.

- Advertisement -

नागरिक साध्या वेशातील पोलीस

कॉलेज रोड चौकीत २४ तास पोलीस कार्यान्वित राहणार आहेत. मिनी पोलीस ठाण्यांमुळे गुन्हेगारीला आळा बसणार आला गुन्हेगारी आटोक्यात यावी, यासाठी शहर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले जाणार आहेत. सध्या प्रायोगिक तत्वावर मुख्य चौकात ८०० कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामध्ये ३५० कॅमेरे फेस व ओडिओ डिक्टटर आहेत. नागरिकही साध्या वेशातील पोलीस आहेत. त्यादृष्टीने त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे.

विश्वास नांगरेपाटील, पोलीस आयुक्त

- Advertisement -

डिजिटल पोलीस चौकीतील सुविधा

२४ तास पोलीस चौकी कार्यान्वित. चार सीसीटीव्ही कॅमेरे सुविधा, वायफाय सुविधा, इंटरनेटव्दारे पोलीस ठाणे व चौकी जोडलेले, संपर्ण परिसरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यासाठी एलईडी स्क्रीन, महत्वाचे नंबर, मुख्य सूचना प्रदर्शित करण्यासाठी डिजीटल बोर्ड, पोलीस व नागरिकांसाठी स्वच्छता गृह, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था.

चौकीत कार्यरत असणारे पोलीस

सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र बैसाणे, हेड कॉन्स्टेबल भारत बोळे, पोलीस हवालदार सतिश जाधव व राहुल सोळसे हे कॉलेज रोड पोलीस चौकीत दिवसरात्र नियुक्त राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -